बदलापूर !! विज वितरण कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख आक्रमक,,,
विज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन केले अनोखे आंदोलन,,,

कुळगाव बदलापुर शहरामध्ये गेले अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विजेचा लपंडाव आणि विजमंडळ अधिकारी व कर्मचारी यांची मुजोर भुमिका, या मुळे शहरातील सर्व सामान्य नागरीक संताप व्यक्त करत आहेत, सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली असल्याने नागरीक कमालीचे हैराण झाले आहेत, मध्यंतरी बदलापुर शहरातील तापमान ४२ पेक्षा जास्त सेल्सिअस राहीले होते,आता पर्यंत बदलापुर शहरातील सर्वात जास्त उष्णतेच तापमान म्हणून हवामान खात्याने नोंद घेतली आहे, अशा मध्ये विज वितरण कंपनी कडून विजेचा चाललेला खेळ खंडोबा या मुळे नागरीक त्रस्त झालेले आहेत, दिवस तसेच रात्रीतून सलग तिन चार तास लाईट जात असल्याने, लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांना ऊष्णतेचा भयंकर त्रास सोसावा लागतो, या मुळे विज पुरवठा कंपनी विरोधात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे,
याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी थेट कुळगाव बदलापुर पश्चिम सोनिवली येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांना चांगलेच धारेवर धरले, अविनाश देशमुख यांनी सरळ विज मंडळाचे ऊप अभियंता यांच्या कॅबिन मध्ये जाऊन ऊप अभियंता यांची खुर्ची बाहेर काढून आगळावेगळा निषेध नोंदवला,
या वेळी विज मंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांनी अविनाश देशमुख यांच्याशी फोन व्दारे संपर्क साधुन समजुत काढण्याचा प्रयत्न केला,
परंतु अविनाश देशमुख यांनी सर्वच अधिकाऱ्यांना खडेबोल सुनवत भविष्यात विज पुरवठा वारंवार खंडित केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे, शहरातील सर्वच विज ग्राहकांनी अविनाश देशमुख यांचे आभार व्यक्त करत त्यांनी घेतलेल्या भुमीके बाबत समाधान व्यक्त केले आहे,