बदलापूर !! (सोमवार) ठाणे जिल्ह्यातील बदलापुर आणि मुरबाड शहरात सर्वात जास्त उष्णतेचा कहर,,

ठाणे जिल्ह्यातील बदलापुर आणि मुरबाड शहरात सर्वाधिक तापमान सोमवारी अनुभवायला मिळाले, संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तापमान ४१ सेल्सिअस पेक्षा जास्त तर बदलापूर मध्ये हे तापमान ४२•५ आणि मुरबाड परिसरात ४३•२ अंश सेल्सिअस अशी नोंद करण्यात आली आहे, त्या मुळे सोमवार हा दिवस ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त उष्णता असलेला दिवस अशी नोंद झाली आहे, सोमवार पहाटे पासूनच वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती, सकाळी सुर्यदेव अतिशय तळपत उगवला असल्याने सकाळ पासुनच ऊष्णतेचा कहर झाला होता, त्या मुळे साधारण अकरा वाजता नंतर नागरिकांनी घरा बाहेर पडणे टाळले असल्याने त्या नंतर संपूर्ण दिवसभर सगळीकडे अगदी शुकशुकाट झाला होता,बस रिक्षा,ट्रेन मधुन प्रवास करताना देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांना ऊष्णतेचा सामना करावा लागला, संध्याकाळी सुर्य मावळल्यानंतर देखील ऊष्णतेचा जोर कायम होता, बदलापुर बरोबर कळवा ठाणे भिवंडी मुरबाड या ठिकाणी अनुक्रमे ४२•५,४२•३’ ‘४२•१ ४२•६ अशी विक् नोंद हवामान खात्याने घेतली आहे,