भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी मधुन सुरेश टावरे कींवा निलेश सांबरे यांना मतदारांची सर्वात मोठी पसंती,,

लोकसभा निवडणुका आता जाहीर झाल्या असून १९ एप्रिल पासून सात टप्प्यात देशभरात निवडणूका होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे, महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील निवडणूका २० मे रोजी होणार असुन या विभागातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातील संघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना महायुतीत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून,
कपिल पाटील यांनी आपल्या प्रचाराला देखील सुरवात केली आहे, तर महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाही,महाविकास आघाडी मध्ये कॉंग्रेस,शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचा समावेश आहे, कॉंग्रेस पक्षा मधुन,
भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या उमेदवारीसाठी बाळासाहेब थोरात तर
माजी खासदार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीसाठी खुद्द मल्लिकार्जुन खर्गे यांनी आग्रह धरला आहे,
तर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी सोडण्याचा आग्रह धरला असून बाळ्या मामा म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून प्रचाराला देखील सुरवात केली आहे, परंतु अद्याप कोणाचीही उमेदवारी जाहीर झाली नसल्याचे कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे, या मध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही,
त्यात जिजाऊ संघटनेचे नेते निलेश सांबरे यांनी या निवडणुकीत भाग घेण्याचा निश्चय केला असुन, निलेश सांबरे हे कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे, त्या मुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे,कोकण विभागातील आपल अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी सोडण्याचा आग्रह धरला आहे,
परंतु भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आलेले उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांना मतदार संघात हवी तशी पसंती मिळताना दिसत नाही, बाळ्या मामा म्हात्रे यांचा जवळपास सर्वच राजकीय पक्षांतुन प्रवास झाला असल्याने मतदारसंघातील जनता बाळ्या मामा म्हात्रे यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करेल असे वाटत नाही, तर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने चर्चेत असलेले उमेदवार सुरेश टावरे आणि दयानंद चोरगे यांच्या मध्ये तुलना करताना कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि कॉंग्रेस पक्षाला मानणारे जवळपास ऐंशी टक्के मतदार सुरेश टावरे यांना सर्वात जास्त पसंती दाखवत असताना दिसत आहेत,
नुकतेच काहीच दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा ठाणे जिल्हा आणि मुंबईत दाखल झाली होती, या वेळी भिवंडी मध्ये कॉंग्रेस पक्षाची हवी तशी ताकद राहुल गांधी यांच्या निदर्शनास आली नसल्याचे चित्र समोर आहे,
मुंबई मध्ये राहून गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीची भव्य दिव्य जाहीर सभा झाली असल्याने कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, परंतु भिवंडी लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाला उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळत असल्याने कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे,कारण भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार संघ असुन या मतदारसंघात मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा मतदार असुन हे मतदान कॉंग्रेस पक्ष सोडून दुसरीकडे जात नाही, या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फुट पडली असुन दोन्ही पक्षातील एक गट भारतीय जनता पक्षाच्या महायुती बरोबर आहे तर दुसरा गट महाविकास आघाडी बरोबर आहे, या मुळे भिवंडी शहरातील कॉंग्रेस पक्षाचे असलेले फिक्स मतदान आणि शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्या गटातील मतदान या वेळी कॉंग्रेस उमेदवाराला विजयासाठी निर्णायक ठरणार आहे,तर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील कॉंग्रेस पक्षाला मदत करण्याची तयारी दर्शवली असल्याने आणि महत्त्वाचे म्हणजे
भारतीय जनता पक्षाचे सध्याचे उमेदवार खासदार कपिल पाटील आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या मधिल संबंध मागील काळात कमालीचे बिघडले असुन आमदार किसन कथोरे हे कपिल पाटील यांना निवडणूक प्रक्रियेत मनापासून मदत करतील असे वाटत नाही,
त्यात जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे जरी कोणत्याच पक्षाने तिकीट दिले नाही तरी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याने निलेश सांबरे हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या महायुतीतील मतदान ओढून घेणार असल्याने कपिल पाटील यांना ही निवडणूक अतिशय जड जाणार आहे ही वस्तुस्थिती आहे, या साठी महाविकास आघाडी कडून कॉंग्रेस पक्षाला उमेदवारी मिळाली तर या वेळी बदल निश्चित असुन भिवंडी लोकसभा मतदारसंघातुन कपिल पाटील यांना हार पत्करावी लागणार आहे,
यात देखील कॉंग्रेस पक्षाकडून सुरेश टावरे यांनाच उमेदवारी मिळण्याची ईच्छा मतदारसंघातुन व्यक्त केली जात असुन कॉंग्रेस पक्षाने देखील सुरेश टावरे यांना उमेदवारी दिल्यास कॉंग्रेस पक्षाचा विजय हा नक्की मानला जात आहे, मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुरेश टावरे यांना तिन लाखांपेक्षा जास्त मतदान झाले होते,सन २००९ मध्ये सुरेश टावरे हे मतदार संघांतील घराघरात पोहोचलेले असुन त्यांची सुसंस्कृत आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणून मतदार संघात त्यांची ओळख आहे,या मुळे महाविकास आघाडीची ताकद सुरेश टावरे यांना मिळाली तर २०२४ मधिल भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कॉंग्रेस पक्षाचे नेते सुरेश टावरेच असणार हे मात्र नक्की,,त्याच यदाकदाचित निलेश सांबरे यांना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यास निलेश सांबरे हे देखील भिवंडी लोकसभा मतदारसंघातुन हमखास निवडुन येतील,, एकंदरीत भिवंडी लोकसभा मतदारसंघात २०२४ मध्ये कॉंग्रेस पक्षाचाच खासदार होणार हे नक्की,,,,,