ताज्या घडामोडी

बदलापूर! ‘तुम्ही महार आमच्या होळीच्या ठिकाणी का आलात”असे म्हणत बौद्ध तरुणांना बेदम मारहाण,, आरोपी अटकेत

बदलापूर पुर्व पोलिस ठाण्याचे हद्दीतील शिवाजी चौक परिसरात होळी वरुन दोन गटा मध्ये झालेल्या मारामारीत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,

बदलापुर पुर्व परिसरातील सम्राट अशोक नगर या ठिकाणी राहणारे युवक आदित्य धनगर, प्रफुल्ल धनगर, आणि,आर्यन अमोल राऊत हे दिनांक ६ मार्च २०२३ रोजी शिवाजी चौक या ठिकाणी होळीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते या वेळी त्यांची आपसात मस्करी सुरू असताना बाजुलाच ऊभा असलेला मराठा समाजाचा ईसम ज्ञानेश्वर भोसले यांनी या तिघांच्या जवळ जाऊन तुम्ही महार समाजाचे असुन ही होळी तुमची नाही असे म्हणत अश्लील शिविगाळ करण्यासाठी सुरवात केली या मुळे वाद निर्माण होवून, ज्ञानेश्वर भोसले,बाळा लाड राजु लाड, सौरभ लाड,मयुर लाड, देवेंद्र भोसले ऊर्फ गोट्या आणि ईतर यांनी होळी मधिल लाकडी दांडक्याने आदित्य धनगर, प्रफुल्ल धनगर आर्यन अमोल राऊत यांना बेदम मारहाण करून जखमी केले,

या मध्ये पिडित बदलापुर पुर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता आरोपी बाळा लाड राजु लाड यांनी आरती अमोल राऊत यांना देखिल धक्का बुक्की केली, या वरुन प्रकाश धनगर यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर भोसले, बाळा लाड, राजु लाड, मयुर लाड, देवेंद्र भोसले,व ईतर दहा ते पंधरा अनोळखी ईसमांवर अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंध अधिनियम कलम ३(१)आर एस ( ३) (१) वाय सह कलम ३२४,३२३,१४३,१४४,१४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून ज्ञानेश्वर भोसले बाळा लाड,राजु लाड यांना पोलिसांनी अटक केली आहे,यातील आरोपी यांच्यावर या आधी देखील विविध कलमान्वये गुन्हे दाखल असुन, मारहाणीत जखमींना कात्रप येथिल मॅट्रिक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, या मध्ये सहायक पोलिस आयुक्त जगदीश सातव यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणिल पडवळ,क्रॉईमचे पोलिस निरीक्षक विक्रमसिंग कदम, सहायक पोलिस निरीक्षक डि वाय कदम घटनेचा तपास करत आहेत,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.