ताज्या घडामोडी

बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४० ते ४५ जनावरांची कत्तल,, गुन्हा दाखल,,सहा आरोपी अटकेत

बदलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई

कुळगाव बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बदलापूर कान्होर रोडवर एकाच ठिकाणी ४० ते ४५ गाईंची मुंडकी, आतडी आणि चामडी आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे, दिनांक १० जुन २०२५ रोजी मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ शैलेश काळे, बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक धनंजय मोरे, बदलापूर पुर्व पोलिस ठाण्याचे क्राईम पि आय राजेश गज्जल, सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे, आणि सानप तसेच बदलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या सह ईतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, सुमारे पाचशे किलो गोमांस ताब्यात घेतले, पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बदलापूर गावातील काही ठिकाणी धाडी टाकून मुस्लिम मोहल्ल्यातुन सहा आरोपींना अटक केली,अधिक चौकशी केली असता हा गो हत्येचा प्रकार असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी आरोपींवर, जनावरांची अवैधपणे कत्तल केल्या प्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११ पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ आणि बि एन एस कलम ३/५ ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून ईतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.