ताज्या घडामोडी

डॉ. माया ताई रोकडे यांना ,सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांच्या हस्ते महीला सन्मान पुरस्कार प्रदान.

प्रतिनिधी मुंबई

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२५व्या जयंती निमित्त आज रोजी आंबेडकरी युवकांच्या वतीने मुंबई चेंबूर येथे पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या समारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर महिला उपसथित होत्या. त्याठिकाणी १२५ महिलांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. त्यावेळी मा. पत्रकार सुनिल भोसले यांच्या हस्ते डॉ माया ज्ञानोबा रोकडे रा. पुणे यांना त्यांच्या विशेष समाज कार्याबद्दल महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ माया ज्ञानोबा रोकडे हया मूळच्या सासवड जिल्हा पुणे येथील रहिवाशी असून त्यांचे सासर लोहगाव आहे. त्यांच्या मागे त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. १९८५ सालापासून डॉ. माया रोकडे यांचे सामाजिक कार्य अविरतपणे चालू आहे. गरिबां विषयी त्यांना विशेष आपुलकी आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांचे वडील ज्ञानोबा पांडुरंग रोकडे व सासुबाई सौ. गिरिजा दादू ओव्हाळ यांची प्रेरणा आहे.


यापुढेही त्यांचे कार्य जोमात चालु आहे. पुढील काळात गरीब पेशंट साठी मोफत अद्यावत हॉस्पिटल त्या सुरू करणार आहेत. त्यांच्या या कार्याला आंबेडकरवादी युवकांच्या शुभेच्छा. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले उपस्थित होते.
त्याचबरोबर जयाताई बनसोडे, आभीनेत्री मोनल कडलक, वृषाली ताई कांबळे, पत्रकार स्नेहा मडावी, विशाल कांबळे, आयोजक समन्वयक विक्की सिंगरे हे देखील उपस्थित होते..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.