अंबरनाथ तहसीलदार मा,प्रशांती माने यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार कुसुमताई चंद्रमोरे यांना पुरस्कार प्रदान

अंबरनाथ! सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार कुसुमताई चंद्रमोरे व सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी साळवे यांना आंबेडकरी युवक यांनी जाहीर केलेला पुरस्कार अंबरनाथ तालुक्याच्या तहसीलदार प्रशांती माने यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला,
लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे, सचिव श्री भरत कारंडे,संघटक सचिव जगन्नाथ जावळे, सहसचिव संतोष क्षेत्रे,लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नानाभाऊ शेळके, संघटनेचे ऊल्हासनगर तालुका अध्यक्ष संदीप साळवे वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबरनाथ येथील तहसील कार्यालयात मा, तहसीलदार प्रशांती माने यांनी सदरचा पुरस्कार कुसुमताई चंद्रमोरे व नंदिनी साळवे यांना प्रदान केला,
मुंबई महाराष्ट्र राज्यातील आंबेडकरी युवक आयोजित महिला सन्मान मेळाव्यात समाजसेविका पत्रकार कुसुमताई चंद्रमोरे व सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी साळवे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,त्याग मूर्ती माता रमाई यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील १२५ महिलांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता, या मध्ये कुसुमताई चंद्रमोरे व सामाजिक कार्यकर्त्या, नंदिनी साळवे,यांचा समावेश आहे, दिनांक २६ मार्च २०२३ रोजी आंबेडकरी युवकांच्या वतीने मुंबई चेंबूर येथील अमर महाल परिसरातील पंचशील नगर या ठिकाणी सदरच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, मुंबई महाराष्ट्रातील आंबेडकरी युवक विकी शिंगारे,विशाल गायकवाड, प्रदीप लिहिणार, डॉ अशिष तांबे, संदिप जाधव, प्रदीप अडांगळे सुरेश येडे,नरेश शिरसाट, क्रांती खेडे,प्रतिक वाघ, सुरेश धाडी यांनी सदरच्या महिला मेळाव्याचे आयोजन केले होते, या वेळी उपस्थित मान्यवरांनी कुसुमताई चंद्रमोरे व सामाजिक कार्यकर्त्या,, यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या