अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने सत्कार व पद नियुक्ती

*डॉ सुरेश राठोड*
कोल्हापूर प्रतिनिधी:
कोल्हापूर (करवीर) तालुक्यातील शिवाजी मंदिर हॉलमध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती कोल्हापूर विभागीय अध्यक्ष मा.धनंजय सराटे यांनी एक आगळा वेगळा कार्यक्रम राबवला,
. आई-वडिलांचा सत्कार असा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता, तसेच यावेळी माऊली महिला ग्रह उद्योग समूहाचे उद्घाटन सोहळा, गुणगौरव सोहळा, घरगुती गणपती सजावटीचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुजीतभाऊ चव्हाण, प्रविण काकडे, शोभाताई बल्लाळ, डॉ.सुरेश राठोड, राजेश भोसले, गजानन कोले, अविनाश पाटील, सागर शिपेकर, दिगंबर तोरस्कर, बी.व्ही. शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, ज्येष्ठांना व स्पर्धेतील विजेत्यांना शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
तसेचसमाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे अष्टपैलू व्यक्तीमत्वांचा पैकी महेश घोरपडे, नौशाद शेख, सुरेश अतिग्रे, मेघा भोसले, योगिता बागे, चेतन गायकवाड, डॉ.अजित येलपले, प्रकाश पाटील, सचिन शिंदे यांचा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे वतीनी सत्कार करण्यात आला. समीर जमादार प्रदेश अध्यक्ष, पूजा शिंदे महिला जिल्हा अध्यक्ष, सौ.बागे मॅडम उपजिल्हा अध्यक्ष, संजय कात्रट जिल्हाअध्यक्ष यांनी याप्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी अशी माहिती जिल्हा अध्यक्ष संजय कात्रट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.