महाराष्ट्र

बदलापूर मध्ये ११ डिसेंबर २०२२ रोजी महापुरुषांचा अवमान करणारे भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निषेध रॅलीचे आयोजन,,,,,.

बदलापूर! गेले अनेक काळा पासून भारतीय जनता पक्षाचे आमदार तसेच सरकार मधले मंत्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या बाबत जाणिवपूर्वक आक्षेपार्ह विधान करत अवमान करत आहेत, काहिच दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस सरकार मधिल असलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याने देशभरात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात कोशारी हटावची मोहिम देखील सुरू झाली आहे, आणि आता भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी लोकांकडून भिक मागुन शाळा सुरू केल्या असल्याचे विधान केल्याने, देशभरात आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाला आहे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गेल्या काही काळापासून महापुरुषांचा अवमान करण्याचे सत्र सुरू केले असल्याने बहुजनांच्या भावनांचा आता देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला बघायला मिळत आहे,याच पार्श्वभूमीवर बदलापुर शहरातील आंबेडकरी अनुयायांच्या विविध संघटनांची बैठक दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी बदलापुर पश्चिम रमेशवाडी येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्या जवळ आयोजित करण्यात आली होती, या वेळी दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता निषेध रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बदलापुर शहरातील आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे, दिनांक ११ डिसेंबर (रविवारी) २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता सदरची निषेध रॅली बदलापुर पश्चिम रमेशवाडी येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या पासून सुरू होणार असून बदलापुर पश्चिम बसडोपो येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ रॅलीची सांगता करण्यात येणार आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.