बदलापूर मधिल अर्धवट असलेल्या होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यास महाविकास आघाडीचा विरोध,,

कुळगाव बदलापुर शहरातील होम प्लॅटफॉर्मचे काम अर्धवट स्थितीत असताना देखील, स्थानिक खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी उद्घाटनाचा घाट घातला असल्याने, महाविकास आघाडीच्या वतीने भाजपा खासदार कपिल पाटील यांच्या या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शविला आहे, गेले अनेक महिन्यांपासून या होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू असुन, या ठिकाणी रेल्वे प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा अद्याप निर्माण केलेल्या नाहीत,होम प्लॅटफॉर्म वरिल सरकते जिने,ऊन्हा पासून अथवा पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेड, तिकीट घर, कॅन्टीन, महिला , पुरुष शौचालय किंवा अन्य कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना खासदार कपिल पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून अशा अर्धवट स्थितीत असलेल्या होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे, या कार्यक्रमाला स्थानिक महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार विरोध केला आहे
अशा प्रकारे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ठाणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे, अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत कारंडे बदलापुर शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जाधव, बदलापुर शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष किशोर पाटील यांनी दिला आहे, या वेळी स्थानिक स्टेशन मास्तर यांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले असून, विरोध असताना देखील अशा प्रकारे नागरिकांना दिशाभूल करण्याचा कार्यक्रम केल्यास महाविकास आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा कॉंग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी दिली आहे