ताज्या घडामोडी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या वतीने पाणी प्रश्नावर दिनांक २८ फेब्रुवारी पासून वसई विरार महापालिके समोर बेमुदत आंदोलन,,,

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशप्रमुख श्री समीर सुभाष वर्तक बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 पासून वसई तालुक्यातील ६९ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना, आणि दिवाणमान येथील सर्वधर्मीय स्मशानभूमी तसेच IIT आणि NEERI च्या अहवालानुसार धारण तलाव (Holding ponds) बनविण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विरार येथील मुख्यालयासमोर “बेमुदत उपोषणास” बसणार.

वसई विरार शहर महानगरपालिका नागरिकांना सेवा देण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन नागरिकांच्या जगण्यामरण्याशी निगडित असलेले प्रश्नही फक्त लेखी तेही खोटारडे आश्वासन देण्यापलीकडे सुटतच नाहीत.


दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या श्री समीर सुभाष वर्तक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री मॅकेन्झी डाबरे यांच्या “आमरण उपोषणा” च्या तिसऱ्या दिवशी तसेच दिनांक 1 जून 2023 रोजी खालील पैकी आणि एकूण 28 महत्वाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी श्री समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या “धडक मोर्च्याच्या” वेळी महानगरपालिकेतर्फे लिखित स्वरूपात आश्वासन देण्यात आले होते. परंतु एकही प्रश्न सोडवण्यात महानगरपालिकेला यश आलेले नाही. म्हणूनच खालील नमूद महत्त्वाचे प्रश्न ज्यामध्ये 1. वसईतील ६९ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना जून 2021 पर्यंत कार्यान्वित करण्याचे कळविले होते, परंतु ही योजना आजतागायत चालूच झालेली नाही.
2. वसईतील सर्वधर्मीय नागरिकांसाठी दिवाणमान येथील सर्व्हे नं. 176 मधील सर्वधर्मीय स्मशानभूमी ही पूर्ण होण्याची समस्त वसईकर वाट पाहत आहेत.
3. त्याचप्रमाणे अनधिकृत मातीभराव व अनधिकृत बांधकाम यामुळे मागील 7 ते 8 वर्षांपासून सातत्याने बुडणारी वसई आणि भविष्यात वसई बुडू नये म्हणून १२ कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या IIT आणि NEERI च्या अहवालाप्रमाणे धारण तलाव (Holding Ponds) आणि इतर उपाययोजनांची त्वरित अमलबजावणी करणे फार गरजेचे आहे अन्यथा मागील ५ ते ६ वर्षांप्रमाणे ह्या वर्षीही पावसाळ्यात पुन्हा वसई पाण्याखाली जावून नागरिकांचे प्रचंड नुकसान होणार आहे.


वरील तीन प्रमुख आणि एकूण 28 प्रलंबित विषयांवर सातत्याने पाठपुरावा असे लक्षात आले आहे की महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेले आश्वासन पुर्णपणे खोटे असून महानगरपालिकेनी संपूर्ण वसईकर नागरिकांची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे श्री समीर सुभाष वर्तक वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 पासून “बेमुदत उपोषणाचे” आंदोलन करणार आहेत. तसेच नागरिकांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी “बेमुदत उपोषणावेळी” वसई विरार मधील अनेक ठिकाणी “रास्ता रोको” आंदोलनही करण्यात येणार आहे आणि त्यावेळी जर “कायदा व सुव्यवस्था” बिघडली तर संपूर्ण जबाबदारी वसई विरार शहर महानगरपालिका व महानगरपालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक म्हणून आयुक्तांची राहील असा इशाराही देण्यात आलेला आहे.
यावेळी यावेळी महाराष्ट्र काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस श्री टोनी डाबरे, श्री अम्मार पटेल, श्री अभिजित घाग आणि श्री निझाम खान, प्रदेश सचिव श्री आमिर देशमुख व श्री इब्राहिम बकाई, वसई विरार जिल्हाप्रमुख श्री डेरीक फूर्ट्याडो, जिल्हा कार्याध्यक्ष श्री संदीप किणी उपाध्यक्ष श्री तारिक खान, श्री संजय पाटील, जिल्हा सरचिटणीस श्री जमील देशमुख, श्री संकेत वसईकर, जिल्हा सचिव श्री संदेश भोईर तसेच वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री साबीर शेख हे देखील उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.