बदलापूर मधिल शेकडो शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दिले समर्थन,,,

बदलापूर प्रतिनिधी! आज दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी बदलापुर मधिल शेकडो शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपले समर्थन जाहीर केले आहे, बदलापुर मधिल शिवसैनिक मोठ्या संख्येने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समर्थन देणार असल्या बाबत सर्वात प्रथम” लोकपालक न्युज” ने वृत्त प्रसारित केले होते, आणि आज शिवसेनेच्या कट्टर शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली, त्या मुळे आता बदलापुर मध्ये शिवसेनेचा सुपडा साफ झाला असे म्हणता येणार नाही,
बदलापुर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असले तरी बदलापुर मधिल शेकडो शिवसैनिक शिवसेने बरोबर म्हणजेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे आज स्पष्ट झाले आहे, बदलापुर शिवसेनेचे संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे आणि अतुल राव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक शशिकांत पातकर, किशोर पाटील,नरेश मेहेर, प्रशांत पालंडे, गिरीश राणे,अहंकारे, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका,यांच्या सह शेकडो शिवसैनिकांची मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून आगामी होणाऱ्या कुळगाव बदलापुर नगरपालिकेच्या निवडणुकी बाबत या वेळी महत्वाची चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे, बदलापुर शहरा मध्ये आता शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा सामना आता येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत बघायला मिळणार आहे, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जरी बदलापुर मधिल पहिल्या फळीचे पदाधिकारी गेले असले तरी दुसऱ्या तिसऱ्या फळीतील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिवसेने बरोबरच असणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटी दरम्यान शिवसैनिकांनी सांगितले आहे, या मुळे आता बदलापुर मध्ये भाजपा , एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असा सामना निवडणुकीत बघायला मिळणार असून ईतर पक्षसंघटनांचा कल देखील महाविकास आघाडी कडे असल्यामुळे पालिका निवडणुकीत आता कोणते पक्ष कोणता नवा खेळ मांडणार आहे हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे, एकंदरीत बदलापुर मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपलेली नसुन शिवसेना अधिक कट्टरतेने तयार झाली असल्याचा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी व्यक्त केला असून आता बदलापुर शहरासाठी नवीन शिवसेना प्रमुख कोण? या कडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे,