ताज्या घडामोडी
ठाणे शहरातून वंचित बहुजन आघाडीचे राहुल म्हस्के कॉंग्रेस पक्षात दाखल
प्रतिनिधी! नरसिंग कट्टा

ठाणे शहरातुन वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राहुल रोहिदास म्हस्के यांनी आज दिनांक २९/७/२०२३ रोजी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला,आज ठाणे शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात म्हस्के यांना कॉंग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष ऍड विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले, राहुल म्हस्के यांना मागासवर्गीय सेल ब्लॉक २ चे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे,
या वेळी कॉंग्रेस पक्षाचे ठाणे शहर सरचिटणीस कुमार केरकर, चिटणीस हयात खान, राजेश टीपणीस ,ब्लॉक २ चे अध्यक्ष ऍड, आनंद सांगळे, कार्याध्यक्ष अशोक नळवाला,विधी सेल अध्यक्ष ऍड सिंह बिस्ट, ब्लॉक उपाध्यक्ष परमेश्वर माळवदे,प्रभाग अध्यक्ष अच्युत नलावडे,वार्ड अध्यक्ष भास्कर गडामी यांच्या सह ठाणे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,