अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबाला”कपिल पाटील फाऊंडेशन” कडून मदतीचा हात
पत्रकार अरुण ठाकरे याज कडून

शहापूर: तालुक्यातिल गेगाव येथे अतिव्रूष्टी मुळे अजित डोंगरे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून त्यांचे घराचे व आतिल सामानाचे अतोनात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
गेगाव येथील भर पावसात घराची भिंत कोसळून कुटुंब अडचणीत आल्याचे समजताच शहापूर कपिल पाटील फाउंडेशंचे सतीश सापले यांनी घटना स्थळी धाव घेऊन कूंटुबाला धिर देऊन त्यांना मदत केली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक तलाठी,ग्रामसेवक यांच्याशी तात्काळ संपर्क केला असता घटनास्थळी भेट दिली असता पिडीत कूटुंबाला जास्तीतजास्त शासकीय मदत लवकरात लवकर मिळावी अशी सूचना केली.
डोंगरे यांच्या घराचे झालेले नुकसान पाहता झालेल्या दुर्दैवी घटने बाबत भाजपा तालूका अध्यक्ष भास्कर जाधव,विधानसभा निवडणुक प्रचार प्रमूख अशोक ईरणक,केंद्रीयं मञी कपिल पाटील यांना माहीती देवुन डोंगरे कुदुंबाला मोदी आवास योजनेतुन घर मिळवून देण्या करिता सहकार्य करावे अशी विनंती केली.या शहापूर कपिल पाटील फाउंडेशन चे सतीश सापले, समाजसेवक विठठल डोंगरे,रिपाई अध्यक्ष किशोर चन्ने,नितीन निमसे व गावातील ग्रामस्थ उपस्तित होते.