राजकीय

बदलापूर मधुन मोठ्या प्रमाणात शिवसैनिक ऊद्या दिनांक ६ ऑगस्ट रोजी बारा वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त,,,,,

बदलापूर! सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतुन बंडखोरी करून आपल्या चाळीस आमदारांसह स्वंतत्र गट तयार करून शिवसेने पुढे मोठे आव्हान उभे केले आहे, एकनाथ शिंदे यांनी पक्ष आदेश झुगारून भारतीय जनता पक्षा बरोबर सरकार स्थापन करुन मुख्यमंत्री पदही हासिल करुन शिवसेना पक्षावर हक्क देखील सांगितले आहे, दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे ठामपणे सांगितले जाते,या सर्व घडामोडी आता कायद्याच्या कचाट्यात असल्याने सर्वोच्च न्यायालयात या बाबत अनेक याचिका सुनावणीसाठी दाखल आहेत, त्या मुळे शिवसेना नक्की कोणाची हा निर्णय लवकरच न्यायालयात होईलच परंतु आता शिवसेनेत दोन गट झाल्याने शिवसैनिकांची मात्र चांगलीच ससेहोलपट झाली आहे, राज्यभरातुन मोठ्या प्रमाणात शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या छत्रछायेखाली जाऊन थांबले आहेत तर मातोश्रीवर देखील राज्यभरातुन शिवसैनिकांचे लोंढेच्या लोंढे जाऊन उध्दव ठाकरे यांना आपला पाठिंबा जाहीर करत असताना दिसत आहेत, राज्यात शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा संघर्ष प्रामुख्याने बघायला मिळतो आहे, बदलापुर शहरा मध्ये देखील शिवसेना प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास सर्वच शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे,त्या मुळे निदान बदलापुर शहरा मध्ये तरी असा संघर्ष बघायला मिळेल असे वाटत नसताना बदलापुर शहरातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात ऊद्या दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी बारा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेऊन आपले समर्थन जाहीर करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे, या मुळे आता बदलापूर मध्ये देखील एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष बघायला मिळेल असे म्हणायला हरकत नाही

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.