गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारास परवानगी द्या *ग्राहक कल्याण फाऊंडेशनची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी*

सोलापूर (प्रतिनिधी ) मागील अनेक महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने गुंठेवारी खरेदी विक्रीस निर्बंध घातल्याने लाखों मिळकत धारक अडचणीत सापडले असून त्यांची फार मोठी आर्थिक कोंडी झालेली आहे सोलापूर शहरातील हद्दवाढ भागातील जवळपास 90% पेक्षा जास्त मिळकती गुंठेवारीच्या आहेत मागील अनेक महिन्यापासून राज्य सरकारने गुंठेवारी खरेदी -विक्री व्यवहारला मनाई व प्रतिबंध केल्याने हद्दवाढ भागातील नागरिकांना अनेक आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतं असून हद्दवाढ भागातील गुंठेवारी मिळकतीच्या खरेदी -विक्री वर प्रतिबंद लावल्याने राज्य सरकार चा कोट्यावधी महसूल बुडत असून यापूर्वी राज्य सरकारनेच हद्दवाड भागातील गुंठेवारी खरेदी -विक्री करण्यास परवानगी दिल्याने या भागातील लोकांनी विविध बँका पतसंस्था खाजगी सावकार तसेच घरातील मौल्यवान वस्तू गहाण ठेवून या भागात मिळकती खरेदी केल्या आहेत आता राज्य सरकार ने या मिळकती खरेदी -विक्री करण्यास मनाई केल्याने हद्दवाड भागातील खरेदी -विक्री व्यवहार ठप्प झाला असून राज्य सरकार ने अन्याय केल्याची भावना मिळकत धारकांमध्ये होत असून गुंठेवारी दस्त नोंदणी बंद असल्याने विवाह मुलांचे शिक्षण घरगुती अडचण निवारण करण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या मिळकती असून देखील विक्री करता येत नसल्याने अनेकांना खासगी सावकारा ज्यादा व्याज देऊन आधार घ्यावा लागतं असून जनतेच्या मूलभूत हक्कावर राज्य सरकार ने संक्रात आणल्याने मिळकत धारकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे त्याच बरोबर दस्त नोंदणी बंद असलेने राज्य सरकार चा कोट्यावधी महसूल देखील बुडत असून लाखों रुपयांच्या मिळकती कवडीमोल होत आहेत अनेक अडचणी असल्यामुळे मिळकत धारक नोटरी व्यवहाराने अत्यंत कमी किंमतीत या मिळकती च्या विक्री होत आहेत
*हद्दवाढभागातील गुंठेवारी खरेदी -विक्री व्यवहार बाबत मा जिल्हाधिकारी यांनी राज्य सरकार कडे पत्रव्यवहार करून मान्यता मिळवून द्यावी अशी मागणी ग्राहक कल्याण फौंडेशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे*