
मुख्यमंत्र्यांना एकाच महिन्यात थकवा जाणवू लागला. उद्धव ठाकरे यांच्यावर उठसुठ टीका करणारे टीकोजीराव एका महिन्यात दमले. दिल्लीश्वरांनी आत्ता पुरे झाले दौरे ! असा सल्ला दिला असावा.मंत्रीमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे अडसर ठरत असावेत म्हणून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असावा.कारण आज देवेंद्र फडणवीस एकटेच दिल्लीला गेले आहेत. भाजपाला मलईदार खाती घेऊन झाली की एकनाथ शिंदे गटाची बोळवण 13 मंत्रीपदं तीही दुय्यम दर्जाची दिली जातील.
त्यामुळे तुम्ही विश्रांती घ्या आम्ही तुमचा परफेक्ट गेम वाजवतो,असे तर दिल्लीच्या आलाकमानला सुचवायचे नसेल ना. इंग्रजीत एक म्हण आहे,Beggers have no choice.अर्थात याचकाला काही पर्याय नसतो,जे पदरी पडले ते पवित्र मानावे लागते.
शिवसेनेत फुट पाडण्याचा भाजपाचा गेमप्लान यशस्वी झाला आहे., आत्ता एकनाथ शिंदे व त्यांचे फुटीर आमदार हे भाजपासाठी गाजराची पुंगी आहे,वाजली तर वाजली नाही तर खाऊन टाकली !
सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेची टांगती तलवार आहेच,तो निकाल शिंदेंच्या विरोधात गेला तरी भाजपाचे काहीच नुकसान नाही. भाजपाचे आमदार व दोन्ही कडील अपक्ष आमदार मिळून भाजपाचे संख्याबळ महाविकास आघाडी पेक्षा अधिक होते.राष्ट्रपती राजवट आली तरी भाजपाचा गेम सुपर सक्सेस होइल.एकनाथ शिंदेंचा फुटीर गट हा वाघाच्या गुहेत शिरलेला कळप आहे.त्याचे काय होईल हे येणारा काळच ठरवेल.