बदलापूर !! पालिका प्रशासनाकडून विसर्जित केलेल्या गणपती बाप्पांचे पुन्हा एकदा विसर्जन,,,

कुळगाव बदलापुर पश्चिम ऊल्हासनदी पात्रात नुकतेच पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले होते, परंतु या वेळी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नदीला देखील मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते,सुरक्षेचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाकडून गणपती विसर्जनासाठी नदी पात्रात खोलवर जाण्यासाठी गणेश भक्तांना मनाई करण्यात आले होती,
त्याच प्रमाणे पालिका प्रशासनाकडून ऊल्हासनदी चौपाटीवर कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती, आणि या कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले होते,
परंतु मोठ्या प्रमाणात पडत असलेला पाऊस आणि विसर्जनासाठी आलेल्या गणपती बाप्पांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्याने, गणेश भक्तांनी नदि पात्राच्या बाजुलाच गणेश मुर्ती विसर्जन केल्या होत्या, परंतु जास्त प्रमाणात गणेश मुर्त्या ह्या पर्यावरण पूरक नसल्याने नदिच्या पाण्यात व्यवस्थीत विरघळत नसल्याने गणपती मुर्त्या अक्षरक्ष:, तुटून गेल्या मुळे नदी पात्राच्या कडेला हात पाय मान तुटलेल्या छिन्नविछिन्न गणेश मूर्ती वाहुन आल्याने एकदम विचित्र चित्र निर्माण झाले होते,
त्याच प्रमाणे गणपती बाप्पाच्या बरोबर आणलेल निर्माल्य देखील ऊल्हासनदी चौपाटीवर अस्ताव्यस्त टाकून दिले असल्याने अधिक भयानक अवस्था झाली होती,
या बाबत पालिका प्रशासनाने दखल घेऊन नदी पात्राच्या बाजुला वाहुन आलेल्या गणेश मूर्त्या पुन्हा एकदा खोल पाण्यात विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आणि पालिका प्रशासनाच्या कर्मचारी यांनी सर्व गणेश मूर्ती जमा करून पुन्हा एकदा खोलवर नदी पात्रात विसर्जित केल्या असल्याने गणेश भक्तांनी समाधान व्यक्त करत पालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.