या बावनखुळेला पत्रकार काय खुळखुळा वाटले ? _दिलीप मालवणकर (जेष्ठ पत्रकार),

राजकारणाचा रांडबाजार करणा-या सौदेबाजांनी आत्ता पत्रकार हे चाय बिस्कुटवर विकले जाणारे वेठबिगार वाटत असावेत.त्या बिनबुडाच्या व सरड्या प्रमाणे तोंड असलेल्या बावन्नखुळ्याला पत्रकार विकाऊ वाटत आहेत. २०२४ पर्यंत एकही बातमी विरोधात येता कामा नये यासाठी पत्रकारांना चहापानासाठी धाब्यावर न्या, फक्त सकारात्मक बातम्याच आल्या पाहिजेत, असे वक्तव्य त्या बावनखुळ्याने केले.
हा बावन्नखुळे पत्रकारांना आपल्या घरचा पाळीव श्वान समजतो का ? की त्यांनी आपल्या मालकापुढे शेपुट हालवायची व विरोधकांवर भुंकायचे !
अरे बावन्न खुळ्या तुझ्या आलाकमानने खोके देऊन ५२ बोके (४० आमदार व १२ खासदार) विकत घेतले व ते तुमच्या बापाचे बुट चाटत असतीलही परंतू महाराष्ट्रात आमच्यासारखे स्वाभिमानी पत्रकार संख्येने कमी असले तरी जो पर्यंत असे रामशास्त्री बाण्याचे पत्रकार जीवंत आहेत तोपर्यंत तुमच्या आमिषांवर मुतणारपण नाहीत.
तुम्ही गोदी मिडिया विकत घेऊन कितीही सावपणाचा आव आणला तरी सर्वसामान्य जनता त्याला भुलणार नाही. तुम्ही लोकशाहीचे मारेकरी आहात, म्हणूनच त्या तोत-या कामसू सोमय्याचा नंगानाच उघड करणा-या लोकशाही चॅनल वर बंदी आणण्याचे दु:साहस केले.परंतू उच्च न्यायालयाने तुमच्या ढुंगणावर लाथ मारून ती बंदी उठवली.जेव्हा जेव्हा तुम्ही अतिरेकी कृत्य केले न्यायालयाने तुमच्या मुस्कटात लगावून दिली. संजय राऊतचे प्रकरण घ्या, किशोरी पेडणेकरांचे प्रकरण घ्या, केदार दिघेंचे प्रकरण घ्या, बंड्या साळवीची तडीपारी व गणेशोत्सवावरील बंदी घ्या, एम.के. मढवींची तडिपरी घ्या, इतकेच काय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल घ्या ! प्रत्येकवेळी तुमचे थोबाड फोडले गेले, सपशेल उताणे पडलात तरी तुमची बावनखुळेगरी जात नाही ?
पत्रकारांना विकत घ्या, त्यांना पुरस्कार द्या, त्यांना समित्यांवर घ्या आणि आपल्या दावणीला बांधुन ठेऊन भाजपाच्या घाण्याला जुंपा, त्याच्या स्वतंत्र पत्रकारितेचा गळा घोटा, त्यांना रखेल सारखे वागवा, हेच ना तुमचे भाजपा शायनिंगचे बावनखुळे धोरण ? ज्यांना प्राईजटॅग लागतो ते पत्रकार नसतात तर घोडेबाजारात लिलावासाठी ठेवलेले घोडे असतात. सणासुदीला रांग लावून किंमती गिफ्ट स्विकारून तुमची लाल करणारे पत्रकार नसतात तर पत्रकारांच्या वेशातील तृतियपंथी असतात,जे दर बुधवारी जोगवा मागत फिरतात. त्यांवा तुम्ही पत्रकार मानत असाल तर तुम्ही बावन्नखुळेच
आहात.
आजही पत्रकारितेशी इमान राखणारे सत्तेची नव्हेतर सत्याची पाठराखण करणारे सच्चे पत्रकार आहेत. ते तुमच्या पार्ट्या, गिफ्ट, टूर व पैश्यांना न भूलता आपला पत्रकारिता धर्म इमाने इतबारे निभावतात. तेव्हा पत्रकारांना धाब्यावर नेऊन खुश करून, स्वत:ची आरती ओवाळणा-या भडभुंज्या पत्रकारांना तुम्ही कितीही खाऊ पिऊ घाला मात्र जनता मात्र तुमच्यासारखी बावन्नखुळी नाही. ती योग्य तो निर्णय घेण्यास समर्थ आहे, इतकेच बावनखुळेंनी लक्षात ठेवावे.