निसर्गप्रेमी इन्व्हार्नमेंट फाउंडेशन, बदलापूर अंतर्गत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन तसेच प्लॕस्टिकमुक्त ढोके दापिवली करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजन

आज दिनांक ०६/०४/२०२४ रोजी ढोके दापिवली शाळेत निसर्गप्रेमी इन्व्हार्नमेंट फाउंडेशन,बदलापूर घ्या वतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन प्रबोधन तसेच प्लॕस्टिकमुक्त ढोके दापिवली करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.*
*याप्रसंगी वसुंधरा बचाव करिता वसुंधरा प्रबोधन जनजागृतीपर ‘हा नाश थांबवा भूमातेचे तनमन जळते आहे…ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे.’गीतगायन घेण्यात आले.*
*या फाउंडेशन चे विद्यमान उपसचिव श्री.राजेश आपटे यांनी प्लॕस्टिक हटाव मोहिमेच्या यशस्वीते करिता शाळा व शाळा परिसरात प्लॕस्टिक कचरा करु नये.किंवा प्लॕस्टिकचे संकलन पध्दती व उपाययोजना इ.बाबत कृतीद्वारे माहिती दिली.तसेच सर्वांना कापडी पिशव्यांचा वापर करण्याबाबत सूचना दिल्या.शाळेतील सर्व शिक्षकांना संस्थेच्या वतीने कापडी पिशवी देऊन सन्मानित केले.
*एन्ड्राईड स्मार्ट टि.व्हि.द्वारे फाउंडेशनची माहीती प्रचारक श्री.समीर जगताप सर यांनी विशेष माहिती विस्तृतपणे विशद केली.पिपिटी सादर केली.*
*फाऊंडेशन चे सदस्य पूर्णिमा मॅडम,साई शाळेच्या शिक्षिका सौ.अनिता पाटील मॅडम, फाऊंडेशनच्या सदस्या,सीमा जगताप,वैष्णवी समुद्र,उर्मिला जयकर, अनुराधा जगताप (फाउंडेशनचे सदस्या) वसुंधरा बचाव पर्यावरण बचाव बाबत फाऊंडेशन ने आतापर्यंत केलेले कामाविषयी विस्तृत माहिती दिली.(पाचोण येथील वृक्ष लागवड व संवर्धन,५०० पेक्षा जास्त वृक्ष लागवड तसेच जांभूळ वन निर्माण )*
*पर्यावरण वाचवा-माणूस वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, एक तरी झाड तुम्ही लावा,प्लॕस्टिक हटाव पर्यावरण बचाव इ.घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कापडी पिशव्यांचे फाऊंडेशन च्या वतीने कौतुक करण्यात आले
*प्रश्नमंजुषेच्या तासात विद्यार्थ्यांनी श्रवण केलेल्या माहितीनुसार प्रश्नांची अचूक उत्तरे दिली.*
*शाळा विद्यार्थी बरोबर ग्रामस्थांमध्येही जनजागृती करण्याबाबत सूतोवाच केले.*
*शाळेतील तीन्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वसुंधरा बचाव बाबत आपले विचार व्यक्त केले.*
*याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शंकर झाडबुके सर,शाळेचे सेवा जेष्ठ प्राथमिक शिक्षक श्री.पांडुरंग पाटील सर,शाळेचे नवोपक्रमशिल प्राथमिक शिक्षक श्री आनंद सोनकांबळे सर, स्वयं सेवक शिक्षिका सौ.राखी भोईर, श्री.मिलींद गायकर सर इ.उपस्थिती होती.*
सरतेशेवटी सर्वांचे शतशः आभार मानण्यात आले,