कोशिंबी केंद्र जिल्हा परिषद शाळा डोहाळेपाडा येथे शिक्षण परिषदेचे प्रबोधनात्मक आयोजन

कोशिंबी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,(ग्रामपंचायत कार्यालय डोहोळे)केंद्र कोशिंबी ता.भिवंडी येथे 20 जानेवारी 2023 रोजी ठीक सकाळी 10-30 संपन्न झाली.
शिक्षण परिषदेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजीमहाराज, विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तसेच भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीतचे सुमधूर आवाजात गायन करून शब्द सुमनाने स्वागत केले.
उपस्थित प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे यांचे शाल,पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन शाळेचे वतीने यथोचित स्वागत सन्मान ,सत्कार करण्यात आले.
*शिक्षण परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.डाॅ. सुषमा बसवंत मॅडम ,कार्याध्यक्षा ,महाराष्ट्र अंनिस कल्याण शाखा उपस्थित होत्या . “विद्यार्थ्यांसाठी संविधानिक मूल्य” या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की,”भारतीय जनतेला समता,स्वातंत्र्य बंधुभाव, न्याय,मानवी प्रतिष्ठा,प्रदान करणारे आणि विविधता असलेल्या भारत देशाला एकजूट ठेवणारे संविधान, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारण्याचे मूलभूत कर्तव्य सांगणारे संविधान विद्यार्थ्यांना समजावून सांगितले पाहिजे. विद्यार्थ्यांना आपले मूलभूत कर्तव्य व अधिकार यांची ओळख करून देऊन एक सुजाण, सक्षम नागरिक आपण घडवला पाहिजे.”
तसेच प्रमुख मार्गदर्शक मा.उत्तम जोगदंड, कार्यकारी संपादक अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका , यांनी ” *वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज*”या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की,*”वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण भाव.पाश्चात्य देशांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्विकार केल्याने गेल्या चारशे वर्षांत विज्ञानाची अफाट प्रगती झाली.आपणही जुन्या बाबींचा आग्रह न धरता,श्रद्धेला वेगळे ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्विकार केला पाहिजे.विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्तीला उत्तेजन देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे.”* या वेळी अनेक विज्ञान प्रयोग प्रत्यक्ष दाखवून अंधश्रद्धा कशी निर्माण केली जाते,हे लक्षात आणून दिले.
वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा.संजय अस्वले साहेब, कास्ट्राईब कोकण विभाग अध्यक्ष संतोष गाढेसर, विषयतज्ञ जगन्नाथ चोरघे,प्रभारी केंद्रप्रमुख शामराव पवार सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी बहारदार शैलीत केले.
कु.सानिका जाधव व साक्षी जाधव यांनी काढलेली सुंदर रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
उपस्थित सर्व मान्यवर व शिक्षकांना अतिशय सुग्रास मांसाहारी,शाकाहारी,भोजन व चहा नाश्ताची व्यवस्था ग्रामपंचायत डोहोळे तर्फे सरपंच छाया हरड मॅडम यांनी केली.
शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख, ग्रामस्थ,माजी उपसरपंच रेणूका जाधव, वरिष्ठ लिपिक एकनाथ जाधव ,शिपाई गणेश ,शिपाई छाया वाघे यांनी विशेष मेहनत घेतली.
सदर शिक्षण परिषदेत प्रमुख मार्गदर्शक मा.डाॅ.सुषमा बसवंत, कार्याध्यक्षा महाराष्ट्र अंनिस कल्याण शाखा,निवृत्त वैद्यकीय अधिकारी,मा. उत्तम जोगदंड, कार्यकारी संपादक अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका, डोहोळे ग्रामपंचायत सरपंच मा.छाया हरड, सदस्य शुद्धोधन जाधव, सदस्य विजय हरड, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.भिवंडी मा.संजय अस्वले,प्रभारी केंद्रप्रमुख शामराव पवार, कास्ट्राईब कोकण विभाग अध्यक्ष संतोष गाढे,सामाजिक कार्यकर्ते प्रा. निवृत्ती मगर, वरिष्ठ लिपिक एकनाथ जाधव पत्रकार शरद रातांबे,पत्रकार मनिषा भालेराव, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.