गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणार्या कोल्हापुरातील महिलेला वाचवण्यात जिवरक्षकांना यश

*रत्नागिरी – तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी कोल्हापूर येथून आलेल्या महिला समुद्रात बुडली. दरम्यान, तिला सुखरूप बाहेर काढण्यात जीवरक्षकांना यश आले. प्रियांका बालाजी सपाटे (वय ३०, मंगळवारपेठ, कोल्हापूर) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना आज (दि. ३०) दुपारी घडली.*
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी १ वाजता समुद्रात स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने महिला गटांगळ्या खाऊ लागली. ही बाब जवळच असणाऱ्या त्यांच्या पतीच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. जीव रक्षकांनी पोलीस व मोरया वॉटर स्पोर्टच्या मदतीने बुडणार्या महिलेला पाण्याबाहेर काढण्यात आले.
त्यानंतर रूग्णवाहिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल करण्यात आले. तेथे औषधोपचार करून डिस्चार्च देण्यात आला. गणपतीपुळे ग्रामपंचायत, जीवरक्षक गणपतीपुळे, पोलीस नाईक प्रशांत लोहारकर, पोलीस mशिपाई सागर गिरी गोसावी, मोरया वॉटर स्पोर्टस् यांनी विशेष मेहनत घेतली.