कोकण शिक्षक मतदार संघात बाळाराम पाटील यांना चितपट करून ९६८६ मतांच्या आघाडीने ज्ञानेश्वर म्हात्रे यांची विजयाची सलामी,,,

बदलापूर! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकींचा निर्णय २ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला, राज्यभरात कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुका प्रतिष्ठेच्या मानल्या जात होत्या, कोकण शिक्षक मतदारसंघातुन भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना आणि आर पी आय आघाडीचे ज्ञानेश्वर म्हात्रे तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी मधुन बाळाराम पाटील यांच्या मध्ये प्रचंड चुरसीची लढाई बघायला मिळाली, बाळाराम पाटील हे विद्यमान आमदार असताना शिक्षकांशी संपर्कात नसल्याने शिक्षकांच्या मनात खदखद ह़ोतीच जर एखाद्या शिक्षकाला बाळाराम पाटील यांना कामा निमित्त भेटायचच असेल तर पनवेलला जाऊनच भेटावे लागत होते, या मुळे ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये बाळाराम पाटील यांच्या विषयी नाराजीचा सूर होता, मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोते सरांना तिकट नाकारले असताना बाळाराम पाटील यांनी याच गोष्टीचा फायदा घेऊन मतदारांना पैशाचे वाटप करुन मोते सरांचा पराभव केला होता,याचा राग मोते समर्थकांमध्ये होताच,त्यात या निवडणुकीत बाळाराम पाटील यांनी मोते समर्थकांना विश्वासात घेतले नसल्याने त्यांच्यावर पराभवाची वेळ आली असल्याचे बोलले जाते, मागच्या निवडणुकीत बाळाराम पाटील हे ११८३७ मत मिळवून विजयी झाले होते, या वेळी विद्यमान आमदार असताना देखील बाळाराम पाटील यांना १०९९७ मिळाली तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २०६८३ मत मिळुन ते विजयाचे मानकरी ठरले आहेत,निवडणुकी दरम्यान बाळाराम पाटील यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये ईतर जिल्ह्यांपेक्षा जास्त मतदार असताना देखील दुर्लक्ष केले असल्याने त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली असल्याचे देखील बोलले जात आहे, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात एकुण ३७६४४ मतदार असुन ठाणे जिल्ह्यात १५३०० मतदार आहेत, त्या मुळे ठाणे जिल्ह्यातील मतदार ज्या उमेदवाराच्या पाठीशी तोच ऊमेवार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचा आमदार हेच समीकरण आहे, गेल्या निवडणुकी पासून पैसे वाटण्याची पध्दत बाळाराम पाटील यांनीच सुरू केली असल्याने या निवडणुकीत त्यांचाच डाव त्यांच्यावरच ऊलटला असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे, मागच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पराभव झाला असताना देखील ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ठाणे जिल्हा तसेच कोकण परिसरातील शिक्षकांशी कायम संपर्क ठेवून आपले काम सातत्याने करत राहिले, शिक्षकांना निर्माण होणाऱ्या अडचणी बाबत आग्रह भुमिका घेत शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहिले असल्याने ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिक्षकांची मन जिंकण्यासाठी समर्थ ठरले आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बाळाराम पाटील यांच्या विरोधात जोरदार लढत देऊन ९६८६ मत जास्त मिळवून विजयी ठरले, ठाणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखील बाळाराम पाटील यांच्यासाठी कोणताही प्रचार केला नसल्याने आणि नाशिक मध्ये देखील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शुभांगी पाटील यांच्या प्रचारात विषेश रस दाखवला असल्याने महाविकास आघाडीच्या या दोन्ही उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला हे मात्र नक्कीच,,__________
स्थानिक कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे विजयी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे लोकपालक न्युज मिडिया कडून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा