महाराष्ट्रातील राजकारणात दमदार पदार्पन करत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदावर ऍड, दिनेश ठाकरे विराजमान होणार,,,,
शनिवार दिनांक ११ मार्च २०२३ रोजी मुंबई येथे पदग्रहण सोहळा

मुंबई! राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राजकारणाला लवकरच एक नवीन चेहरा मिळणार आहे,, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असलेले ऍड दिनेश ठाकरे यांनी मागील दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदाची समर्थपणे धूरा संभाळून ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या शाखा निर्माण करुन ठाणे जिल्ह्यामध्ये आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांची एक सशक्त फळी निर्माण केली आहे,,
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त ऊमेवार राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी तयार करण्यात दिनेश ठाकरे हे कसोशीने प्रयत्न करत आहेत, ठाणे जिल्ह्यातील अनेक उमेदवार विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी सज्ज देखील झाले आहेत, पेशाने वकील असलेले दिनेश ठाकरे यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने पक्षाला याचा नक्कीच फायदा होणार आहे, आपल्या वकिली पेशाच्या निमित्ताने राज्यातील सर्वच राजकीय नेत्यां बरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध राहिले आहेत,
रिपब्लिकन पक्ष म्हटला तर तो फक्त बौध्दांचा पक्ष अस एक समिकरण नेहमीच मांडल जात, परंतु या समजुतीला छेद देऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अण्णासाहेब कटारे यांनी महाराष्ट्रासह देशभरातील पक्ष कार्यकारण्यांमध्ये बदल घडवून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा कोणत्याही एका जाती पुरता मर्यादित नसून तो सर्वसमावेशक असल्याचे दाखवून दिले आहे, किंबहुना ही महाराष्ट्रातील रिपब्लिकन चळवळीतील पहीली घटना असावी, आताच मागील आठवड्यात पक्षाचे राष्ट्रीय नेते अण्णासाहेब कटारे हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते,
या वेळी दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी ऍड दिनेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते करण्यात आले आहे, मुरबाड तालुका अध्यक्ष विठ्ठल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या वेळी जाहीर सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते, त्या नंतर दिनांक २६ फेब्रुवारी रोजी बदलापुर शहरा मध्ये पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती, पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी सदरच्या बैठकीचे आयोजन केले होते, या वेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी करत असलेले दिनेश ठाकरे यांना बढती देवुन त्यांच्यावर महाराष्ट्र राज्याची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे संकेत अण्णासाहेब कटारे यांनी दिले होते, राज्यातील अनेक पदाधिकारी यांनी अण्णासाहेब कटारे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले,याच अनुषंगाने शनिवार दिनांक ११ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन सि एस टी आझाद मैदान या ठिकाणी कार्यकर्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून याच मेळाव्यात ऍड दिनेश ठाकरे यांचा पदग्रहण सोहळा देखील संपन्न होणार आहे, या वेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला अण्णासाहेब कटारे हे संबोधित करणार असुन ऍड दिनेश ठाकरे यांची महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याचे जाहीर करून त्यांना त्या बाबतचे नियुक्ती पत्र देणार आहेत,
ऍड दिनेश ठाकरे यांच्या नियुक्तीने पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी होणाऱ्या विधानसभा तसेच ईतर निवडणुकीत राष्ट्रिय रिपब्लिकन पक्षाला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे,