कल्याण मध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्याला शिवसेना पदाधिकारी व त्यांच्या गुंडां कडुन मारहाण,, जीवे ठार मारण्याची देखील धमकी

माहिती अधिकार कार्यकर्ता एक सजग नागरिक असून सतत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर बारीक नजर ठेवून असतो ज्या प्रमाणे पत्रकार बातमीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधत असतात त्याच प्रमाणे माहिती अधिकार कार्यकर्ता हा देखील पारदर्शक कारभार सुरू राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो,.
कल्याण महानगरपालिका अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत बॅनर बाजी मुळे कायमच चर्चे चा विषय बनून समोर आली आहे अशीच चर्चा शिवाजी कॉलोनी कल्याण पूर्व येथे एका बॅनर ची झाली, हा बॅनर होता शिवसेना पक्षाचा उपशहर अधिकारी युवासेना,एस इ ओ अभिषेक बने राहणार शिवाजी कॉलोनी यांचा, बॅनर होता वाढदिवसाचा एक महिना उलटून गेला तरी शिवाजी कॉलनी येथील बॅनर ४-जे प्रभागाने उतरवला नव्हता, तसेच मागील काही महिन्यांपूर्वी कमानी,व बॅनर च्या मुद्दावरून अभिषेक बने यांच्या मनी राग खदखत होता दि-१६-०३-२०२३-रोजी दुपारी ०२-वाजण्याच्या सुमारास अमेय हॉस्पिटल समोर चक्की नाका या ठिकाणी माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ चे कल्याण शहर प्रचार प्रमुख यांची दु चाकी गाडी रस्त्यात मध्यभागी अडवून माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद काळकोपरे यांना गुंडांनी रस्त्यात बॅनर बाबत विचारना करत तू आमच्या अभिजित बने चि तक्रार करतो फार समाजसेवा करतो तू फार सोशल मीडिया वापरतो असे म्हणत आमची-पालिकेला विचारणा करतो सोशल मीडिया वर तक्रार करतो हा राग मनात धरून रस्त्यावर-०७-ते-०८-गुंडानी लाथा बुक्यांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली ,त्या वेळेस काही महिला सोडविण्यास पुढे आले असता त्यांना ही धमकवण्यात आले आणि मागे सारले आता अमेय हॉस्पिटल चा परिसर हा वाढत्या गुन्हेगारीचा केंद्र बिंदू बनत चालला आहे मागील काही दिवसांपूर्वी या हॉस्पिटल आवारात एका नागरिकाला मारहाण झाली होती आजच्या ह्या भ्याड हल्याने पोलिस खात्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे, भर रस्त्यात एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला झालेली ही मारहाण म्हणजे जवळ जवळ-१५-मिनिटं हे थरार नाट्य चाललेल्या मारहाणीची साधी कुण कुण ही अमेय हॉस्पिटल पासून हाकेच्या अंतरावर वाहतूक शाखा पोलीस चौकी चक्की नाका यांना झाली नाही ही दुर्दैवाची बाब आहे, कोळसेवाडी पोलिसांनी अमेय हॉस्पिटल आणि शेजारी असणाऱ्या-hdfc बँकचे cctv -फुटेज तपासून त्यातील *संशयित आरोपी सुरेश काळे व ह्या हल्ल्याच्या मागील सूत्रधार अभिषेक बने व त्यांचे गुंड साथीदार यांना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी मागणी माहिती अधिकार महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे,* या गंभीर हल्ल्याची नोंद कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये अदखलपात्र गुन्हा क्रमांक-८३२ /२०२३-व ३२३ ,५०४ कलमांन अंतर्गत अज्ञात इसम म्हणून नोंद केली आहे, त्यातील एका हल्लेखोरांची ओळख पटलेली आहे तेव्हा पोलिसांनी त्या गंभीर गुन्ह्याची नोंद दखलपात्र गुन्ह्यात करावी अशी मागणी चे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ यांनी स्थानिक पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख साहेब यांना अर्जाद्वारे केली आहे, या बाबत सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलिस उपायुक्त आणि पोलिस आयुक्त ठाणे यांना देखील निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले आहे,, संपूर्ण महाराष्ट्रात माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या वर सतत चे होणारे हल्ले याची गंभीर दखल मुंबई मा.उच्च न्यायालयाने ही घेतली आहे तसेच राज्यातील विविध भागांतील माहिती अधीकार कार्यकर्ते समाजसेवक/व्हीसल ब्लोअर भ्रष्टाचारात ज्यांचे हितसंबध किंवा समाजकंटक गुंड यांच्या कडून प्राणघातक हल्ला मारझोड अशा घटना वारंवार घडत आहेत अशा घटनांची मा.उच्च न्यायालयाने दखल घेऊन सुमोटो रिट पिटीशन क्रमांक ४६६/२०१०-मध्ये झालेल्या प्रत्येक सुनावणी दरम्यान सदर कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण पुरविण्या बाबत शासनास वेळोवेळी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत, महाराष्ट्रात लोकशाहीचे राज्य आहे की गुंडशाही चे राज्य चालु आहे? हा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी ऊपस्थित केला आहे,