बदलापूर! लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेची ठाणे जिल्ह्यात जोरदार मोर्चे बांधणी
कुसुमताई चंद्रमोरे यांची महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती

लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक आज दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी बदलापुर जवळील राहटोली या ठिकाणी संपन्न झाली,
लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी पत्रकार संघटनेच्या ठाणे जिल्हा आणि मुंबई मधिल संघटनेच्या बांधणी बाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली,
बैठकीत लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पदी कुसुमताई चंद्रमोरे, ठाणे जिल्हा सरचिटणीस सुरेश जगताप, कल्याण तालुका अध्यक्ष म्हणून ऊमेश भारती, ऊल्हासनगर तालुका उपाध्यक्ष म्हणून सिध्दार्थ भगवान मोकळे तर ऊल्हासनगर तालुका संघटक म्हणून रोहित सुरेश सोनवणे,,यांची निवड करण्यात आली, प्रदेश अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले, या वेळी उपस्थित मान्यवरांनी संघटना बांधणी बाबत आप आपली प्रभावी मते मांडली,
संघटनेचे प्रदेश सचिव श्री भरत कारंडे यांनी या वेळी उपस्थित मान्यवरां सहकार कायदा मार्गदर्शन पुस्तके देखील भेट देऊन संघटने बाबत मार्गदर्शन केले, संघटनेचे संघटक सचिव जगन्नाथ जावळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, या प्रसंगी पोलिस बॉय संघटनेचे पदाधिकारी ऊमेश भारती, ऍड, संतोष पुजारी, ऍड,किरण पाटील, कुकरेजा, यांची प्रमुख उपस्थिती होती, तर पत्रकार संघटनेचे प्रदेश सहसचिव संतोष क्षेत्रे, ठाणे जिल्हा अध्यक्ष नाना भाऊ शेळके, ऊल्हासनगर तालुका अध्यक्ष संदीप साळवे, प्रदेश संघटक गणेश काटकर,नरसिंग कट्टा त्याच प्रमाणे राहटोली ग्रामपंचायत उपसरपंच चेतन बनकर यांनी मार्गदर्शनपर आपली मते व्यक्त केली