घटनेची सत्यता न पडताळता श्री सदस्यांच्या मृत्युचे राजकारण आणि टिका करणे हे या महाराष्ट्र भुमीच दुर्दैवच म्हणावे लागेल

महाराष्ट्र भूषण , खारघर येथील घटने बाबत..
Club मधील खुप सारे members हे स्वता: खारघर येथील पुरस्कार सोहळयात उपस्थित होते. त्यांच्यासोबत बोलल्या नंतर, व club मधील बहुतांश अधिकृत सदस्यांच्या मताने आम्ही हे मांडत आहोत..
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचं ढिसाळ नियोजन अजिबातच नव्हतं. उत्तम नियोजन होतं. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय व्यवस्था सर्व काही उत्तम होतं. मेडिकल व्यवस्था ही चोख होती. पार्किंग ची योग्य सुविधा, ट्राफिक होवू नये म्हणून प्रत्येक दिशेने येणाऱ्या गाड्यांचे सुबक नियोजन, जागोजागी सदस्य हर तर्हेचे सहाय्य करण्यास उभे होते. कुठलीही अपेक्षा न ठेवता. तिथे कचरा होवू नये ह्यासाठी प्रत्येक जण खबरदारी घेत होता.
ह्याप्रकारची अजून काय ती व्यवस्था हवी?
कार्यक्रमासाठी सकाळची वेळच बरोबर होती. संध्याकाळची वेळ असती तर, लांबून येणाऱ्या सदस्यांना वेळेत पोहचता यावे म्हणून लवकर येवून पूर्ण दिवसभर तिथे बसावे लागले असते. यामुळे, ही वेळ मागिल प्रत्येक कार्यक्रमाच्या अनुभवाने ठरवली गेली होती.
देशभरातील सर्व बैठकींत सुचना करण्यात आल्या होत्या की, वयोवृध्द, लहान मुलं आणि कुठल्याही प्रकारच्या स्वास्थ कमकुवत असणाऱ्या सदस्यांनी कार्यक्रमाला येवूच नये. उन्हापासुन बचाव व्हावा म्हणूंन येताना सोबत छत्री, मुबलक पिण्याचे पाणी, फळे इत्यादी आणावे, जेवनाचा डब्बा ई. सोबत घ्यावे. बसण्यासाठी चादर आणावी. घाई गडबड करु नये या व इतर त्या सर्व योग्य सुचना आठवडा भर आधी पासुनच सतत बैठकी मार्फत दिल्या जात होत्या.
याआधी ही असे कार्यक्रम झालेले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या सत्तेच्या वेळी असे पुरस्कार सोहळे आयोजित केले आहेत
.
अध्यात्मिक कार्यास या पुरस्कारांची गरज ती काय? असे म्हणत असाल तर, कानाकोपऱ्यात कित्येक लोक वस्तींच्या घरोघरी पोहचलेल्या या परमारर्थिक शिकवणी द्वारे कित्येक जणांचे आयुष्य सुधारले आहे, कित्येक जण व्यसनां पासुन अलिप्त झालेले आहेत. वाम मार्गाने कित्येक जाणारे उत्तम व समाधानी आयुष्य जगत आहेत. ही कित्येक म्हणून असणारी संख्या करोडों मध्ये आहे!
या प्रत्येकास आपल्यातील हा बदल ज्यांद्वारे झालेला आहे त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची, जवळून अनुभवण्याची तिव्र ईच्छा असते.
पण इतकी प्रचंड सदस्य संख्या असणाऱ्या या कार्यात प्रत्येकास भेटणे व पाहणे या अध्यात्मिक परिवाराचे मुख्य असणाऱ्यास अशक्य असते. म्हणून, अश्या प्रकारच्या पुरस्कारांचे निमित्य साधून इतक्या मोठ्या स्थरावर काही वर्षांनी (5-6 वर्षांतून एकदा) असे कार्यक्रम प्रतीष्ठान द्वारे आयोजित केले जातात. व त्यावेळी च्या सरकार व शासना कडून ही यांस पुर्णपणे सहाय्य केले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक ‘प्रमुख राजकीय पक्षां’ कडून हे कित्येक वर्षां पासुन केले जात आहे.
देशभरातून कानाकोपऱ्यातून आलेले लोक जाति धर्म सारे काही विसरुन एकमेकां सोबत बसले होते! मनुष्य ही जात व माणुसकी हा धर्म अशी शिकवण असलेल्या या प्रत्येकाच्या द्वारे संघटीत जनशक्ती च्या भारतिय संस्कृतीचे व एकतेचे ते विशाल रूप भासत होते! असला प्रकार घडला नसता तर या भारतिय एकतेचा संदेश संपुर्ण विश्वभरात पोहचला गेला असता. तसे विश्व किर्तिमान द्वारे अश्या प्रकारच्या दोन कार्यांस याधी गिनिज बुक व लिम्का बुक द्वारे गौरविन्यात ही आलेले आहे.
लाखो लोकांचा (सुमारे 25 लाखांहून अधिक) जनसमुदाय स्वखर्चा ने व स्वयंस्फुर्ती ने त्या ठिकाणी आला होता, हा काही आणला गेला नव्हता! कुणासही येण्याची सक्ती नव्हती. आपापल्या मर्जीने यावे असे आमंत्रित करण्यात आलेले होते. तशी सक्ती असती तर देशातील कोणतीच जागा पुरेशी पडणार नाही इतकी मोठी श्रीसदस्य संख्या आहे!
या परमार्थ द्वारे केले जाणारे सामाजिक उपक्रम हे फक्त याचे बाह्य स्वरुप आहे. खरे कार्य तर जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक माणसात सुयोग्य अध्यात्मिक मार्गाद्वारे उत्तमाचे बदल घडवून आणने, व याद्वारे कुटुंब, समाज, व राष्ट्रास सज्जनता रूजवने हे आहे. हे ही कुठल्याही प्रकारच्या आर्थिक ची अपेक्षा न ठेवता. जगभरात जिथे जिथे या परमार्थीक बैठक आहेत तिथे येणाऱ्या सदस्यां द्वारे एक रुपयाची ही मागणी यासाठी केली जात नाही! कुणास तशी काही ईच्छा असल्यास स्व-खुशीने द्यावे व नाही दिले तरी प्रत्येकास तिच वागणूक जी इतर प्रत्येकास आहे! फक्त या.. उत्तम विचार घ्या, आचरणात आणा, चांगले कर्म करा तरच चांगले होईल हिच एकमेव शिकवण!
कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, की व्यक्ती पुजा नाही! श्रीदत्त श्रीपाद श्रीवल्लभ अवताराचे अधिष्ठान व प्रत्येक देवते चे विधिव्रत पुजण केले जाते. निरुपण करताना वा पुजण करताना प्रत्येक जाति धर्माच्या व्यक्तीस हा मान दिला जातो. श्रवणास बसणाऱ्या प्रत्येकास कोणत्याही जाति वा धर्माचा किंवा श्रीमंत गरीब असा कुठलाही भेदाभेद न करता, कोणता पद आहे असे न ध्यानात घेता सर्वांना एकसमान वागणूक दिली जाते.
आपण सारे जातिय वाद पुर्णपणे विसरुन भारतीय म्हणून, माणुस म्हणून कसे एक होवू शकतो हे ईथे संगितले जाते. स्वदेश, स्वदेव, स्वधर्म याची निरुपण व श्रवणा द्वारे सातत्याने ओळख करून दिली जाते.
नव्या पिढीला भारतिय संस्कृती व संस्कारांचा अभिमान वाटावा, आदर्श वाटावा, त्यांच्यात जनसेवा, राष्ट्रसेवा रुजू व्हावी, संत शिकवनीतून उत्तम माणुस घडावा, आपले समाज ऋण, कुटुंब ऋण, राष्ट्र ऋण फेडण्यासाठी अनेक उपक्रम ईथे सातात्याने केले जातात.
स्वता:ला ओळखून स्वहित व आत्महित साधण्या साठी आठवड्यातून एकदा शिकवणी साठी श्रवण व प्रत्येक दिवसात अध्यात्मिक उपासनेची जोड दिली जाते. याने लहान मुलांना, तरुणांना, स्त्री व वृद्धांना सत्कर्म व सदाचरणात रहाण्याची प्रेरणा दिली जाते.
450 वर्षांपुर्वी शांडील्य आडनाव असणार्या या कुटुंबियांस स्वराज्यातील सेनापती कान्होजी आंग्रे यांनी त्याकाळी यांद्वारे सुरु असणार्या अध्यात्मिक कार्याची दखल घेवून धर्माधिकारी हे आडनाव दिले होते. तेव्हा पासुन हे कार्य त्या व या स्वरुपात त्या त्या वेळी राजकीय शासना द्वारे असे गौरविण्यात येत आहे.
यावेळी, कार्यक्रम सुरु व्हायला थोडा उशीर झाला. व उन्हाच्या तीव्रतेचा त्रास हा प्रत्येकास झाला. सभा मंडप सोडून, जवळपास 400 एकर मध्ये बसलेल्या 25-30 लाख सदस्यां करता 2ते3 तासांच्या कार्यक्रमा साठी मांडव टाकणे शक्यही नव्हते. या घटने द्वारे जे झाले तसे व्हावे हे कुणास ही वाटत नव्हते, कुणी असे काही होईल याची कल्पना ही केली नव्हती!
देशात कुठलीही घटना होवुदेत, किंवा काहीही चांगले ,वाईट होवुदेत, लगेच त्यास राजकीय वा जातीय रंग दिला जातो!
मुद्दे शोधा, मग त्यावर टिका सुरु करा, विरोध करा, लोकांची माथी भडकवा,
तोडा फोडा व राज्य करा.. ही राजकीय खेळी जनतेस लगेचच कळून यायला हवी..
जे ब्रिटिशांनी केले तेच पुन्हा चालू राहिले तर, त्या व या गुलामीत फरक तो काय!
यावेळी, या अनपेक्षित घटनेने या कार्यास गालबोट लावले जात आहे! खालच्या स्थरावर जावून टिका केली जात आहे. जे पुर्णता: चुकीचे आहे.
सोहळ्यात घडलेली घटना ही वाईटच आहे असे कुठेही कधिही होवू नये, परंतु निसर्गा मुळे व नियतीच्या डावपेचाने मनुष्यां द्वारे होणाऱ्या कर्मातून अश्या घटना घडल्या जातात. ज्याचे दोष कुणासही दिले जावू नाही शकत! अशा वेळी कोण दोषी आहे हे ती नियती ठरवते व तिथे न्याय हा योग्य वेळी होतोच!
अशा प्रकारची घटना, देश व समाजा साठी उत्तमच असणाऱ्या या परमार्थिक कार्यात पहिल्यांदाच घडली आहे. वातावरणातिल बदल व नैसर्गिक आपत्ती चे परिणाम इतके भयंकर होत आहेत यातुन सर्वांनी बोध घ्यावा व यापुढे कुणिही अश्या वेळी असे कार्यक्रम आयोजित करण्या आधी याबाबत अवश्य विचार करावा.
परंतु, याद्वारे जे गालबोट लागले आहे त्याने हे महान कार्य कधीही झाकोळले जाणार नाही व असे कधीही होवू नये.
या काळात अशा कार्याने सद्गुणांची जोपासना करणे हे खुप कठिण आहे. व यासाठी यास सज्जन शक्तीं द्वारे समर्थन देणे आवश्यक आहे.
अशा वेळी,
राष्ट्रहितास योग्य असणार्या प्रतिष्ठान च्या या परमार्थीक कार्याच्या समर्थनिय बाजूने club द्वारे आम्ही पुर्णपणे आहोत.
मृत व्यक्तींना मन:पूर्वक व भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. त्यांच्या कुटुंबियांच्या दुखा:त आम्ही सहभागी आहोत. यातुन सावरण्याची शक्ती त्यांस मिळो, त्यांस योग्य तो न्याय मिळो ही अपेक्षा आहे.
🇮🇳 *वंदे मातरम्ं!*
सादर,
*The DEF*
डॉक्टर्स व इंजिनीअर्स फाऊंडेशन
*राष्ट्रसेवा परमो धर्म:*
NGO : E-12214
www.defm.org.in