प्रदीपभाऊ रोकडे, केवळ पत्रकार नसून शेवटच्या माणसाला न्याय देणारा लोकपालक.!
( समाजमित्र तात्यासाहेब सोनवणे यांजकडून ०५ मे २०२३)

आज जगाला शांतिचा संदेश देणा-या तथागत भगवान गौतम बुद्धांची पौर्णिमा.! याच दिवशी आमच्या भावाचा अर्थात सहपथिक प्रदीपभाऊ रोकडे यांचा* *जन्मदिवस.!* *आज भाऊ तर पावलापावलावर भेटतात. पण लोकपालक न्यूज चॅनेल नेटवर्कचे संपादक प्रदीपभाऊ रोकडे सारखे क्वचितच भेटतात.
तर काही आपल्याच समाजातील भावानां जवळ घ्यायचे का नाकारतात?* *धम्म परिषदा असो, आंबेडकरी साहित्य संमेलने असो,मेळावे,जयंत्या असो, जाणून बुजून टाळतात.विश्ववंदनीय ,भारतरत्न,मानव मुक्तीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लाभलेल्या साठ त्रेसष्ट वर्षात उभे आयुष्य शेवटच्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी समर्पित केले.स्वत:ची मुलं डोळयादेखत* *दगावली. महामानवाची सावली, नवकोटीची माता रमाई* *हालअपेष्टा सोसत निर्वाणाच्या पथाला गेली. तरीही संविधान करत्याने मागे वळून पाहिले.नाही
*म्हणून क्रांतिसूर्य झाले. आज चळवळीच्या गप्पा मारणारांनी थोडे मागे वळून पहायला हवे. आज प्रदीपभाऊ रोकडे यांनी अतिशय कठीण परिस्थितीतून, हाल अपेष्टा सोसत भरारी घेतली आहे.
लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून अधिवेशन, मेळाव्याद्वारे यशस्वी धुरा सांभाळून, आपली पत्रकारिता शेवटच्या,माणसाच्या दारात उभी केली. लोकपालक न्यूज वार्तांकन करून लोकशाहीचा चौथा खांब* *म्हणून ,आक्रोश मोर्चा, आमरण उपोषण करून,अन्याय,अत्याचाराविरुद्ध लढत आहे. पिडीतानां न्याय मिळवून देण्यासाठी, सबंधित शासकीय आस्थापना, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायती,नगरपरिषदा, महानगरपालिका, रेल्वे स्थानक, महावितरण, जीवन प्राधीकरण, अनधिकृत बांधकामे,फेरीवाले,रिक्षा चालक मालक वाहतूक समस्या,दवाखाने, शाळा, महाविद्यालयातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया,भरमसाठ फी वाढ, यांच्या दारात उभे राहून, न्याय दात्यानां, वास्तव चित्रणाच्या माध्यमातून आपले कौशल्य पणाला लावून माहिती देत आहेत,
दैनंदिन जीवनातील प्रसंग, असो राजकीय अनास्था असो, प्रदीपभाऊनीं नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागावा म्हणून, आमच्या सारख्या सामान्याच्या आवाजाला होकार दिला आहे. एकंदर प्रदीपभाऊ रोकडे केवळ पत्रकार नसून, शेवटच्या माणसाला न्याय देणारा ठाणे जिल्ह्यातील लोकपालक असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही. प्रदीपभाऊ निरोगी व उदंड आयुष्य असेच निर्भीडपणे, भरत कारंडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा कुसुमताई चंद्रमोरे, जगन्नाथ जावळे, संतोष,क्षेत्रे,रुतिकेश रोकडे,चेतन बनकर, आशा अनेक सहकार्याच्या मदतीने लढाऊ बाण्याने जगत रहाल असे मनोमन वाटते. यशस्वी वाटचालीला मनोमन मंगलमय शुभेच्छा.! @ समाजमित्र तात्यासाहेब सोनवणे, उपसंपादक सा. साक्षी पावनज्योत, अध्यक्ष रूग्णहक्क संघर्ष समिती, अध्यक्ष सोशल मिडिया,जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स, ठाणे जिल्हा @ ९३२४३६६७०९*