ताज्या घडामोडी

बदलापूर !! उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांनी गुंडा मार्फत घडवून आणलेल्या प्राणघातक हल्ल्याचे बदलापुर पश्चिम पोलिसां समोर आव्हान,,,

बदलापूर !! उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या गुंडांनी महेश बनोटे आणि पत्रकारांवर जीवघेणा हल्ला केला असून जखमींना बदलापुर पश्चिम बॅरेजरोड येथील सह्या तज्ञद्री हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे,विश्वनाथ पनवेलकर आणि महेश बनोटे यांच्या मध्ये गेले अनेक पासुन दगड खदानीवरुन वाद सुरू असुन विश्वनाथ पनवेलकर आणि महेश बनोटे यांनी एकमेकां विरोधात न्यायालयात खटले देखील दाखल केलेले आहेत, कालांतराने हा वाद अधिकच विकोपाला गेला असुन काहीच दिवसांपूर्वी पुर्वी महेश बनोटे यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून स्थानिक वृत्तपत्रातून विश्वनाथ पनवेलकर हे सरकारी जागेत खोदकाम करत असुन मोठ्या प्रमाणात शासनाचे नुकसान करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते त्याच प्रमाणे महेश बनोटे यांनी विश्वनाथ पनवेलकर यांच्या विरोधात अनेक प्रकरणे ऊघड करण्याच्या दृष्टीने दिनांक १६ जुन २०२३ रोजी बदलापुर पश्चिम मातोश्री मंगल कार्यालय ऊल्हास नदी पुलाच्या बाजूला सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असल्याने आपली आता जास्त बदनामी होईल या भितीने विश्वनाथ पनवेलकर यांनी दिनांक १३/५/२०२३ रोजी अंबरनाथ मधील काही राजकीय कार्यकर्ते यांना मध्यस्थी करून हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला त्या बाबत काही मंडळी ( त्यांची नावे बदलापूर पोलीसांना देण्यात आली आहेत) बदलापुर या ठिकाणी आली देखील या वेळी बदलापुर पश्चिम सर्वोदय नगर या ठिकाणी जनता पोलिस टाईम्स चे संपादक प्रदीप गोविंद रोकडे,लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे सचिव भरत कारंडे,प्रकाश कुमार, अंबरनाथ येथील पनवेलकर यांनी पाठवलेले बाळासाहेब खंडागळे,जाधव कांबळे यांच्या मध्ये बैठक होऊन बनोटे आणि पनवेलकर यांच्या मधिल वाद मिटवण्या बाबत सकारात्मक चर्चा झाली आणि त्या नंतर रात्री आठ वाजता बैठक संपवून प्रदीप गोविंद रोकडे,भरत कारंडे आणि महेश बनोटे हे एका नियोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमला हेंद्रेपाडा भारत कॉलेज मार्गे निघाले असताना भारत कॉलेज समोरील एका नॉव्हेल्टीच्या दुकानात साधारण नवु वाजताच्या सुमारास वाढदिवसाच्या निमित्ताने भेट वस्तू घेण्यासाठी गाडीतून उतरले, त्या नंतर भेटवस्तू घेऊन प्रदीप गोविंद रोकडे हे गाडीत जाऊन बसले आणि महेश बनोटे हे गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर सिटरवर बसताच अचानक महेश बनोटे यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे विश्वनाथ पनवेलकर यांनी पाठवलेले तिन गुंड तरुण तोंडावर मास बांधून हातात चॉपर आणि स्टीलचे रॉड घेऊन आले आणि महेश बनोटे यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.

सदर प्रकार पाहून प्रदीप रोकडे यांनी गाडीतून खाली उतरून महेश बनोटे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता मारेकऱ्यांनी प्रदीप रोकडे यांच्यावर देखील स्टिलच्या रॉडने हल्ला चढवला या वेळी आजुबाजुच्या लोकांनी ओरडा ओरड केली असल्याने मारेकरी एका बाईकवर बसून फरार झाले, त्या नंतर प्रदीप रोकडे यांनी १०० नंबरवर फोन करून कंट्रोलला सदरच्या घटनेची माहिती दिली असता बदलापुर पश्चिम पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि महेश बनोटे व प्रदीप रोकडे यांना तातडीने बदलापुर पश्चिम येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले

आणि घटनास्थळाचा पंचनामा करून विश्वनाथ पनवेलकर आणि अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे समजते, आता बदलापूर पश्चिम पोलिसां समोर विश्वनाथ पनवेलकर यांना अटक करण्याचे मोठे आव्हान असल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.