कळवा खारेगाव इथे महाराष्ट्र शासनच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी कोणी राहिलाच नाही का ? _योगेश मुंधरा

ठाणे प्रतिनिधी! खारेगाव इथे महाराष्ट्र शासनाच्या सर्व्हे नंबर ४९/७ या जमिनीवर ठाणे महानगरपालिका कळवा प्रभाग समितीच्या व शिवसेना चे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या आशीर्वादाने बेधडक अनधिकृत इमारत बांधल्या जात आहे. या इमारतींवर ठाणे महानगरपालिका कळवा प्रभाग समितीच्या अधिकारी कुठल्या ही प्रकार ची कारवाई करत नाही.
एकीकडे जिथे महाराष्ट्र शासनाकडे लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय जागा नाही तिथेच हे भूमाफिया नगरसेवक व महापालिका अधिकारी यांच्या संगमतने बेधडक शासकीय जमिनीवर अनाधिकृत बांधकाम उभारत आहे. अतिक्रमण विभागाचे वासूलिखोर कलेक्शन मास्टर लिपिक सहाय्यक आयुक्त महेश अहेर यांना ही बांधकाम दिसत नाही का की या अनधिकृत बांधकामतून मोठी तोड केली आहे ? आयुक्त विपीन शर्मा साहेब शासकीय जमिनीवर चालत असलेले हे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त कधी होणार …..असा सवाल सामाजिक कार्यकर्ते योगेश मुंधरा यांनी उपस्थित केला आहे,