अंबरनाथ तालुका-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजलेल्या युवकांच्या जल्लौषाने व वैविध्यपूर्ण स्पर्धांनी यशस्वी झाली वर्षा सहल २०२२

*निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशित वसलेल्या व आशियातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प तसेच घाटघर येथील लोअर डॕम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी-अंबरनाथ तालुक्याच्या वतीने वर्षा सहलीचे उत्कृष्ट नियोजनाचे आयोजन करण्यात आले होते.या वर्षा सहलीचा प्रारंभ बदलापूर रमेशवाडीतील विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पूतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला.
या वेळी बदलापूर गावांतील युवा तरुण मिञांचा ढोल-ताशे,डि जे साऊंड सिस्टिम इ.च्या तालावर नृत्य करित फेर धरीत नृत्याविष्कार पहावयास मिळाला.अंबरनाथ व वांगणी शहरातून प्रत्येकी एक-एक बस व बदलापूरातून २ बस अशा तब्बल चार बस या वर्षा सहलीसाठी काढण्यात आल्या होत्य
बसला लावलेले वंचितचे झेंडे व वर्षा सहलीचा अॕड.बाळासाहेबांची प्रतिमा असलेले आकर्षक बॕनर शहरातील रस्त्या-रस्त्यावरील उभे असलेले नागरिक आश्चर्याने व कौतुकाने पाहत होते.*
*वांगणी,अंबरनाथ बदलापूरहून निघालेल्या वर्षा सहलीच्या बसेस शहापूरच्या साकुर्ली परिसरात पर्यटनस्थळी जेव्हा पोहचल्या तेथे सर्व युवांचे व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत तालुका निरिक्षक सन्माननिय अनिलजी भवार साहेब,अशोकजी सरोदे साहेब,मधुकरजी साखरे साहेब तसेच तालुका अध्यक्ष दिलीपशेठ पवार साहेब यांनी सर्वांना हस्तांदोलन करुन केले.
या वेळी वंचित व अॕड.बाळासाहेब आंबेडकर करांच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.
*या वर्षा सहलीचे प्रमुख मार्गदर्शक तथा विशेष अतिथी होते ते तरुणाईची धडकन अभ्यासू युवा नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे महासचिव सन्माननिय राजेंद्रदादा पातोडे साहेब,युवक आघाडी सदस्य अक्षयजी बनसोडे सर,स्वाभिमानी बाणा चॕनलचे पञकार-प्रचारक मनोजजी काळे साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली.*
*वर्षासहलीसाठी आलेल्या सर्वांना सर्वप्रथम सुग्रास चविष्ट आगळा वेगळा अल्पोपहार (रताळे,करांदे,अंडी, उपमा,पोहे,ब्रेड-आॕमलेट,सलाड,इ.)देण्यात आला.त्यानंतर सर्वांनी साकुर्ली परिसरातील प्रचंड वाहणाऱ्या धबधब्याखाली भिजत या वर्षासहलीचा आनंद लुटला.* *यावेळी युवकांनी नृत्यअविष्कार केला.या वाॕटरफाॕलवर स्वतः राजेंद्र पातोडे साहेबांनी चित्तथरारक अशी पोहण्यातील उडी पहायला मिळाली.*
*ती चित्तथरारक उडी पाहून व स्वतः ड्रम वाजवतांना पाहून सर्वांनी नृत्याचा एकच जल्लौष केला.
या मौजमस्तीनंतर सर्वांनी वाॕटरफाॕल परिसरात खुर्च्यावर बसवून जागेपर्यंत स्टार्टर पदार्थ (चिकन चिली,लिव्हर पेटा,लाॕली पाॕप इ.) मेजवानीचा आस्वाद घ्यायला मिळाला.याच ठिकाणी युवा आघाडी-महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव सन्माननिय राजेंद्रदादा पातोडे साहेबांनी उपस्थित युवक व सर्वांना वंचित बहुजन आघाडीची पुढील राजकीय वाटचाल,युवकांवर असलेली जबाबदारी,सध्याचे चाललेले घाणेरडे राजकारण,अकोला पॕटर्न,बदलापूर,अंबरनाथ,वांगणी येथून वंचितची ताकद आता वाढली पाहीजे.आपण आत्ता सत्ता ताब्यात घेतली पाहीजे.*
*वंचितचा ठाणे जिल्हा पॕटर्न हा अकोला पॕटर्न आता झालाच पाहीजे.संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी कंबर कसली पाहीजे.*
*आपल्या पोरांनी आता सेना बिजेपी काँग्रेस राष्ट्रवादीत काम करणे सोडून दिले पाहिजे.ठाणे जिल्हा वंचितचा बालेकिल्ला झाला पाहीजे.असे प्रेरणादायी विचार मांडले.यामुळे तरुणाईत जोश निर्माण झाला.आॕल इंडीया पँथर सेनेत काम करणारे युवा नेतृत्व रोहीत बनसोडे यांनी पँथर सेनेचा राजीनामा देत आपल्या शेकडो युवकांना घेऊन साहेबांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला
*यानंतर सर्वांना उंच कडा असणाऱ्या लोअर डॕम व तेथील जलविद्युत प्रकल्पाबद्दल माहीती घेण्यासाठी चालत चालत वर उंचावरील हिरव्यागार डोंगर परिसरात भवार साहेब घेऊन गेले.त्याठिकाणी अंबरनाथ बदलापूर गटात कबडडीचा चुरशीचा सामना पहायला मिळाला.*
*याचे पंच म्हणून सुजित बनसोडे,अतुल कोलगे यांनी काम पाहीले.विविध डावपेच पहायला मिळाले.वंचितची विजयी व रनर अप टिमची ट्राॕफी खेळाडूंना सन्माननिय पातोडे साहेब,भवार साहेब,पवार साहेब,सरोदे साहेब,साखरे साहेब यांच्या हस्ते देण्यात आली.
या वेळी प्रश्नमंजुषा घेण्यात आली.यात अंबरनाथ शहराने बाजी मारली.विविध स्पर्धाचे आयोजन पहायला मिळाले.सर्वांना पातोडे साहेबांनी वंचितचा स्कार्फ पट्टी,वंचितची टोपी परिधान केली.*
*यावेळी भवार साहेब,दिलीपशेठ पवार यांचे मार्गदर्शन झाले.युवकांमधून रोहीत बनसोडे,वांगणी शहर अध्यक्ष वकीलभाई खान,अंबरनाथचे मा.अध्यक्ष प्रविण गोसावी यांनी युवकांना संबोधित केले.सर्वांनी वंचित पक्ष वाढविण्यासाठी जिवतोड मेहनत घेण्यासाठी प्रतिज्ञा घेतली.संध्याकाळच्या समयी पुन्हा वेज-नाॕनवेज पद्धतीचे स्नेहभोजन घेण्यात आले.*
*ही वर्षासहल यशस्वी करण्यासाठी आयोजक नियोजक,भोजन कमिटी,राबणा-या प्रत्येकाचेच तसेच उपस्थित अतिथींचे मार्गदर्शकांचे अमोलजी सासणे व नवनित तायडे,प्रसिद्धी प्रमुख-योगेश येलवे यांनी जाहीर शतशःआभार मानले.याप्रसंगी कुंदनजी पवार महासचिव, बाळकृष्ण गायकवाड उपाध्यक्ष, युवा नेतृत्व सुमित पवार, लक्ष्मण (अण्णा)सोनकांबळे बाबा,नागनाथ कांबळे आदिनी खुप सहकार्य केले ,यानंतर वर्षा सहलीचा परतीचा प्रवास सुरु झाला.अशाप्रकारे सुंदर अशा निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत शहापूर साकुर्ली परिसरात वंचित बहुजन आघाडी-अंबरनाथ तालुक्याच्या वतीने आयोजलेली वर्षा सहल यशस्वीरित्या संपन्न झाली.