पवईतील रिपब्लिकन कार्यकर्त्याच्या हत्येच्या चौकशीसाठि रिपाइं शिष्ट मंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट
किशोर गायकवाड यांच्या हत्येच्या निषेधार्थ रिपाइंचा पवई पोलिस ठाण्यावर शनिवारी मोर्चा

प्रतिनिधी! साईनाथ खरात
मुंबई दि .3 – पवईतील रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे विक्रोळी तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड यांच्या हत्येची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने आज विधानभवन येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रकरणी क्राईम ब्रँच द्वारे चौकशी करण्याचे आदेश देत असल्याचे आश्वासन ना.देवेंद्र फडणविस यांनी रिपाइं शिष्टमंडळाला दिले.
रिपाइंच्या या शिष्टमंडळात राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे,रिपाइं चे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे,मुंबई सरचिटणीस विवेक पवार,कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड,जिल्हाध्यक्ष साधु कटके, प्रकाश जाधव,संजय डोळसे,अजित रणदिवे, रमेश गायकवाड,संजय पवार,सचिनभाई मोहिते,विजय कांबळे आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे विक्रोळी तालुका अध्यक्ष दिवगंत किशोर गायकवाड यांच्या हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या शनिवारी दि.5 ऑगस्ट रोजी दु.12 वा. पवई पोलिस ठाणे येथे मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइं चे राज्य सरचिटणिस गौतम सोनवणे आणि मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी दिली आहे.
रिपाइंच्या या मोर्चा चे नेतृत्व रिपाइं चे रार्ष्टीय सरचिटणीस अविनाश महातेकर, ळात राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे,रिपाइं चे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे,मुंबई सरचिटणीस विवेक पवार,कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड,जिल्हाध्यक्ष साधु कटके, प्रकाश जाधव,संजय डोळसे,अजित रणदिवे, रमेश गायकवाड,संजय पवार,सचिनभाई मोहिते,विजय कांबळे पवई चे बाळ गरुड,राजेश सरकार,भाऊ पंडागळे आदि मान्यवर करणार आहेत.