वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग व पालघर जिल्हा परिषद कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन,,
प्रतिनिधी! वर्षा गायकवाड

वसई विरार शहर महानगरपालिका, क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा २०२३ या स्पर्धेचा शुभारंभ मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. अनिलकुमार पवार यांचे शुभहस्ते गुरुवार दिनांक ०३/०८/२०२३ रोजी जुने विवा महाविद्यालय शेजारील मैदान, विरार (प.) या ठिकाणी करण्यात आला. याप्रसंगी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री. रमेश मनाळे, माजी सभापती श्री. सखाराम महाडिक, श्री. यज्ञेश्वर पाटील, माजी महिला व बालकल्याण सभापती श्रीमती माया चौधरी तसेच अन्य सन्माननीय माजी नगरसेवक व नगरसेविका, उप-आयुक्त श्री. पंकज पाटील, उप-आयुक्त श्रीमती नयना ससाणे, प्र. सहा. आयुक्त श्री. शशिकांत पाटील, शाळांमधील क्रीडाशिक्षक, इतर मान्यवर व कर्मचारी इ. उपस्थित होते.
सदर फुटबॉल स्पर्धा ही दि.०३/०८/२०२३ ते ०६/०८/२०२३ या कालावधीत खेळवली जाणार असून या स्पर्धेमध्ये जवळपास ५२ शाळांतील ९५ संघांनी सहभाग घेतला आहे.