बदलापूर पुर्व परिसरातील नामांकित विद्यालयात चार वर्षिय अल्पवयीन मुलींचा विनयभंग,,, लैंगिक आत्याचार प्रयत्न,,,,
संतप्त महिला संघटनांची आरोपीला ताब्यात देण्याची मागणी,,

बदलापूर पुर्व शाळेतील चार वर्षिय दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटनेने बदलापुर शहरा मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे, मागील काहिच दिवसांपूर्वी बदलापुर पुर्व भागातील एका बारा वर्षिय मुलीवर लैंगिक आत्याचार करुन एका अज्ञात इसमाने पळ काढला असल्याची संतापजनक घटना ताजी असताना, शाळेत शिकत असलेल्या दोन लहान मुलींचा विनयभंग करत लैंगिक आत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,
,झाला प्रकार मुलींनी आपल्या पालकांना सांगीतल्या नंतर, मुलींच्या पालकांनी तातडीने शाळा प्रशासनाची भेट घेऊन, बदलापुर पुर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, वैद्यकीय तपासणी नंतर मुलींवर लैंगिक आत्याचार करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे सांगण्यात आले असून बदलापुर पुर्व पोलिसांनी दादा नावाच्या अनोळखी ईसमा विरुद्ध सी सी टी एन एस नंबर ३८०/२०२४ नुसार भारतीय न्याय सहींता कलम ६५(२) ७४,७५,७६,सह पोक्सो कायदा कलम ४(२) ८,१० प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे, परंतु तक्रार दाखल केल्यानंतर अनेक तासांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याने बदलापुर पुर्व पोलिस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, महिला संघटनांनी केला आहे,
या बाबत पोलिस प्रशासनाच्या विरोधात संपूर्ण शहरामध्ये संतापाची लाट पसरली आहे, सध्या तरी आरोपीला अटक करुन सुरक्षेच्या कारणास्तव बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुर्व पोलिस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे,