मुखेड येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड *स्मारक* ची दयनीय अवस्था, शुशोभीकरण करा *आंबेडकरवादी* पँथर सेनेचे उपोषणाद्वारे मागणी,
नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक -:आंबेडकरी चळवळीचा बाल्लेकिल्ला असलेल्या येवला तालुक्यातील मुखेड या गावात 2009 मध्ये आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे उद्घाटन करून दादासाहेब गायकवाड यांचे स्मारक बांधण्यात आले होते परंतु आज रोजी या स्मारकाची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून त्या ठिकाणी जुगारांचा अड्डा, स्मारकाची तोडफोड तसेच घाणीचे साम्राज्य दिसून येत असल्याने ही आंबेडकर समाजाची थट्टा की काय असा सवाल आंबेडकर समाजाला पडला असल्याचे चित्र दिसून आले
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी तथा खंदे समर्थक कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे विद्रूपीकरण होऊन त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आंदोलन करावे लागते ही या पुरोगामी महाराष्ट्राची खूप मोठी शोकांतिका असल्याचे यावेळी उपोषणकर्त्यांनी लेखी निवेदनात मांडलेले आहे
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे पुनर्बाणी करावी, मुखेड या गावच्या प्रवेशद्वार कमान कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नावाची करण्यात यावी ,मुखेड येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे जीवनावर आधारित संग्रहालय करण्यात यावे ,स्मारकाचे सुरक्षा तथा देखभाल करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये वार्षिक बजेट तयार करण्यात यावे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नावे मुखेड या ठिकाणी वाचनालय तसेच ग्रंथालय अभ्यासिका उभारण्याच्या मागणीसाठी आंबेडकरवादी पँथर सेनेच्या वतीने प्रवीणभाई संसारे, भूषण पगारे आपल्या मागण्यांसाठी तीन दिवसापासून बेमुदत आंदोलन करीत असून आज रोजी त्यांनी अन्नत्याग उपोषण करण्याचा निर्धार केला असून
प्रशासनाने तीन दिवस उलटूनही अद्यापही या आंदोलनाचे दखल घेतलेली नसल्याने कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे शोभीकरण करावे या मागणीसाठी आंदोलन करावे लागते ही खेदजनक बाब असल्याचे चित्र महाराष्ट्रात पसरत असल्याचे बोलले जात आहे
। या आंदोलनाचे दखल न घेतल्यास हा लढा कायम सुरू ठेवण्याचा इशारा प्रवीण संसारे, तुषार पगारे ,किरण तुपे आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते भिमराव खळे ,वचिंत चे शशिकांत जगताप ,आंबेडकर राईट पॅंथर ऑफ इंडिया चे शांतारामभाऊ दुनबळे यांनी दिला