सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संस्थेच्या वतीने वह्या व लेखन साहित्य वाटप उद्घाटन कार्यक्रम संपन्न

सम्राट अशोक विजया दशमी व धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संस्थेचा शालेय विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्य वाटप उद्घाटन कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड सर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हापरिषद शाळा बौद्धपाडा वेहळोली ता.शाहापूर जि.ठाणे येथे 5 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10-30 वाजता संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,महामानव विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुमधूर आवाजात ईशस्तवन व स्वागतगीताचे गायन केले. बौद्धपाडा शाळेच्या वतीने सर्वांचे गुलाबपुष्प देऊन मुख्याध्यापक संतोष जाधव यांनी स्वागत केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव जगदीश गायकवाड सर माजी अध्यक्ष वसंत धनगर सर माजी अध्यक्ष भास्कर गायकवाड व अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी संस्था राबवत असलेल्या शैक्षणिक, सामाजिक अनेक उल्लेखनीय उपक्रमा विषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले.
*यावेळी बौद्धपाडा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या,शालेय लेखनसाहित्य (पेन, पेन्सिल, खोडरबर, शाॅपनर, पट्टी,रंगबाॅक्स) व बिस्किट पुडा वाटप करून वह्या व लेखन साहित्य वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन केले*
तसेच मोहपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना तेथील शिक्षक रमेश भोईर यांचेकडे वह्या व लेखन साहित्य सुपूर्द कले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक
संदीप वाकचौरे यांनी तर प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस जगदिश गायकवाड यांनी केले. अध्यक्षीय भाषण संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केले .
तद्नंतर जिल्हापरिषद शाळा सावरोली येथे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. शालेय विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्य वाटप करण्यात आले.तिन्ही जिल्हापरिषद शाळेतील 110 विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड सर, सरचिटणीस जगदिश गायकवाड, खजिनदार होमराज शेंडे,माजी अध्यक्ष भास्कर गायकवाड, माजी अध्यक्ष वसंत धनगर सर,उपाध्यक्ष बळीराम गायकवाड, संचालक शिवराम चन्ने,औदुंबर गंगावणे, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष राहूल जाधव, ग्रामस्थ भागीरथी पतंगे,जाधवताई,संदीप पतंगे,एकनाथ सोष्टे,दुंदाराम सोष्टे,अनिल पवार,राजू गायकवाड, भरत सोष्टे,श्याम कांबळे सावरोली ग्रामपंचायत सरपंच रोहण चौधरी,शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्षा बेबी सोंगाळ,ज्येष्ठ नागरिक चौधरी बाबा,मुख्याध्यापक संतोष जाधव, संदीप जाधव,मुख्याध्यापक,कास्ट्राईब शिक्षक संघटना शाहापूर अध्यक्ष मनोज गोंधळी ,सहशिक्षक विजयकुमार उदार उपस्थित होते.