बदलापूर! क्रॉग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी भरत कारंडे यांची नियुक्ती,,

बदलापूर! भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या, अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी, भरत शामराव कारंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, कॉंग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे, यांच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने, भरत कारंडे यांच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब केले आहे,
भरत कारंडे हे कॉंग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असुन या पुर्वी त्यांनी अनुसूचित जाती विभाग बदलापुर शहराचे अध्यक्ष म्हणून काम केलेले असुन, त्यानंतर ठाणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून देखील भरत कारंडे यांनी मागील काळात कार्यभार सांभाळला होता, आपल्या राजकीय तसेच पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत भरत कारंडे यांनी समाजाच्या हितासाठी अनेक आंदोलने करुन सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे, आंबेडकरी चळवळीतील खंदा कार्यकर्ता म्हणून भरत कारंडे यांची ओळख असुन सहकार क्षेत्रात देखील ते करत असलेली कामगिरी ही उल्लेखनीय आहे,
या मुळे ठाणे जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या मुलभूत समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पक्षाने भरत कारंडे यांच्यावर दिली असून,आपण पक्षाने दिलेली जबाबदारी ही समर्थपणे पार पाडणार असुन पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याचे भरत कारंडे यांनी म्हटले आहे,भरत कारंडे यांच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदाच्या नियुक्ती मुळे त्यांच्या समर्थकांनी समाधान व्यक्त केले असुन ठाणे जिल्हा तसेच राज्यभरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,