राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याकडुन सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वकिलीचा पेहराव असलेल्या पुतळ्याचे अनावरण

भारतीय संविधानाच्या गौरव दिनाच्या निमित्ताने देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वकिलीचा पेहराव असलेल्या पुतळ्याचे अनावरण केले आहे,
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करुन अभिवादन करण्यात आले, या वेळी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश देखील उपस्थित होते,
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदेशात जाऊन बॅरिस्टर पदवी मिळवली आणि पुन्हा भारतात आल्या नंतर सर्वच स्तरातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले होते, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश सरकारच्या कारागृहात खिचपत पडलेल्या अनेक भारतीयांची निर्दोष मुक्तता केली आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पदव्या मिळवल्या परंतु त्यांचा उपयोग फक्त देशाच्या कल्याणासाठी केला,२६ नोव्हेंबर १९४९ ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत तात्कालिक पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना कठोर परिश्रम करून लिहलेली राज्यघटना बहाल केली आणि २६ जानेवारी १९५० रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची किर्ती जगभर पसरली,भारत देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने या संविधानाची दखल घेतली, अशा या महामानवाची प्रेरणा न्यायालयातील सर्वच न्यायाधीश वकिल आणि येणाऱ्या पिढीने घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीचा पेहराव असलेल्या पुतळ्याचे अनावरण केले आहे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे तमाम भारतीय नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत,