ताज्या घडामोडी

धनगर आरक्षण प्रश्नी कल्याणी वाघमोडे यांचा नाशिक जिल्हा दौरा,,,, ,चांदवडला भेट देऊन मुंबई व दिल्लीच्या आंदोलनाची समाजबांधवांशी चर्चा,,

नाशिक प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक-:अहिल्यादेवी होळकर महिला विकास प्रतिष्ठान प्रेरित क्रांती शौर्यसेना अध्यक्ष सौ कल्याणीताई वाघमोडे व धनगर समाजबांधव यांनी समाजाच्या विविध मागण्यांसाठी डिसेंबर महिन्यात दिल्लीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या प्रेस नोट मध्ये नमूद केले आहे की धनगर समाजाला 1 महिन्याच्या आत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी 30 ऑक्टोबर ला आझाद मैदान मुंबई व डिसेंबर महिन्यात दिल्ली येथे समाजातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.
गेली ७५ वर्षे धनगर समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे,त्यांनी नमूद केले आहे की राष्ट्रपती महोदयांनी अनुसूचित केलेल्या १ ते ४७ क्रमांकात ३६ नंबरला धनगर जमातीचा समावेश आहे परंतु कोणत्याच सरकारला धनगर आरक्षणाचे भिजत घोंगडे सोडविता आले नाही.धनगर समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे आंदोलन करून निवेदने देण्यात आली आहेत.परंतु सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही,मागील सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी TISS चा अहवाल धनगर समाजाच्या माथी मारत वेळकाढू धोरण राबविले आहे.
त्यांनी सरकारकडे केलेल्या आणखी काही मागण्यांमध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी.मेंढपालांसाठी संरक्षण व राखीव चराई क्षेत्र ,विमा उपलब्ध करावे,आरक्षण आंदोलनातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे व धनगर समाजाला न्याय द्यावा.
२५ ऑक्टोबर पर्यंत राज्यसरकारने केंद्र सरकारला अहवाल पाठवावा अन्यथा ३० ऑक्टोबर रोजी आझाद मैदान मुंबई व ७ ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान दिल्ली जंतरमंतर येथे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी डॉ मनोज पगारे,तुकाराम गाढे,बापू मोरे,जालिंदर मोरे,भगवान बडे,पप्पू बडे,निलेश मोरे,बाळू बस्ते, म्हाळू जाधव,शंकर मोरे,रमेश पानसरे,गणेश नाकोडे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
यातच कल्यानीताई चांदवड येथे भेट दौऱ्यावर आले असताना चन्द्रेश्वर पायथा भागात एक कांदळकर नामक मेंढपाळवर अज्ञातांनी हल्ला केल्याने चांदवड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे,मेंढपाळांवर होणारे हल्ले हा गंभीर विषय असून याबाबत सरकारने लक्ष घालावे असेही कल्यानीताई पुढे म्हणाल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.