राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे हत्ये प्रकरणी सुत्रधारांना देखील अटक करण्याची लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेची मागणी,,,

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा तपास सि आय डी मार्फत करुन या हत्येमागे असणाऱ्या सुत्रधारांवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्या कडे करण्यात आली आहे, त्या बाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने मा, तहसीलदार अंबरनाथ यांना सादर करण्यात आले आहे, राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पातील जमिन घोटाळ्या बाबत शशिकांत वारीशे यांनी आपल्या वृत्तपत्रातून आवाज उचलला असताना, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी त्यांची अपघात घडुन हत्या करण्यात आली आहे, पत्रकारांवर होणारे असे जिवघेणे हल्ले म्हणजे लोकशाहीचीच हत्या करणारा हा प्रकार असुन याचा तपास सि आय डी मार्फत करुन या हत्येमागचे सुत्रधार यांना देखील अटक करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे,त्याच बरोबर पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात पत्रकार सुरक्षा कायद्या अंतर्गत गुन्हे नोंद करण्याची मागणी देखील या निमित्ताने करण्यात आली आहे, या वेळी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे, सचिव भरत कारंडे, सहसचिव संतोष क्षेत्रे तसेच संघटनेचे अनेक पदाधिकारी निवेदन देताना ऊपस्थित होते,