बदलापूर !! आंबेडकरी जनतेच्या विरोधाला धाब्यावर बसवून सोनिवली येथील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा बेकायदेशीर वापर सुरुच,, राजेश सोनावणे
शासकीय स्मारका मधुन ठेकेदाराचा धंदा सुरूच

कुळगाव बदलापुर पश्चिम सोनिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अद्याप पूर्ण झालेले नसताना ठेकेदारा मार्फत स्मारकाचा बेकायदेशीर वापर सुरू असल्याने आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त केला आहे, सुमारे १७ वर्षांपासून सुरू असलेल्या या स्मारकाचे काम अद्याप पूर्ण होत नाही हीच मुळात खेदाची बाब आहे, सर्वात प्रथम या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी पालिका प्रशासनाने पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता, पालिका प्रशासनाने स्मारकाचे काम सुरू देखील केले होते, त्या नंतर स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी भव्यदिव्य आंबेडकर स्मारक बांधण्याची संकल्पना मांडली आणि शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले, शासनाकडून सुमारे आठ कोटी निधी उपलब्ध देखील करुन घेतला,
नागपूर येथील दिक्षाभुमीच्या पाश्र्वभूमीवर आंबेडकर स्मारक बांधण्याचे काम सुरू सुध्दा करण्यात आले, परंतु आजतागायत सुमारे सतरा वर्षे या स्मारकाचे राजकारण करून आंबेडकरी अनुयायांची मते कशी मिळतील असाच प्रयत्न आमदारांकडून सातत्याने करण्यात आला आणि आंबेडकर स्मारक हे राजकीय षडयंत्रात अडकले, बदलापुर पालिका प्रशासनाने स्मारकाचे पुढील काम करण्यासाठी यंत्रणा नसल्याचे कारण देत हे काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले, अर्थात आमदारांनीच दबाव तंत्राचा वापर करून हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यास भाग पाडले, स्मारकाचे काम पूर्ण करुन पुन्हा पालिकाकेकडे वर्ग करण्याचा करार झाला
, परंतु आज सतरा वर्षे पूर्ण झाली असून स्मारकाचे काम काही पुर्ण होताना दिसत नाही,ऊलट अर्थि आमदारांच्या सांगण्यावरुन आंबेडकर स्मारकाच राजकारण करत १६ मे २०२२ रोजी सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून आंबेडकर स्मारकाच बेकायदेशीर लोकार्पण/उद्घाटन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले, तात्कालीन विरोधी पक्षनेते विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे बेकायदेशीर उद्घाटन करण्यात आले, या वेळी सच्चा आंबेडकरी अनुयायांनी आपला तिव्र विरोध दर्शवत आंदोलन केले,काळे झेंडे दाखवून मोठ्या प्रमाणात निषेध देखील करण्यात आला, परंतु काही आंबेडकरी चळवळ गहाण ठेवलेल्यांनी आमदार किसन कथोरे यांना साथ देवुन हा बेकायदेशीर सोहळा घडवून आणला, पोलिस प्रशासनावर दबाव आणून आंदोलन कर्त्यांंची धरपकड करून आंदोलन चीरडुन टाकुन आंबेडकर स्मारकावर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असल्याचे सिद्ध केले,१६ मे २०२२ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पालिका प्रशासनाने परवानगी नाकारली होती, पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती, कोणत्याही शासकीय स्मारका मध्ये कोणत्याही महापुरुषांचे पुतळे उभे करण्याचे असल्यास शासनाच्या अनेक परवानग्या घेणे गरजेचे असते, भगवान गौतम बुद्ध यांची मुर्ती बसवताना अधिक वेगळ्या शासकीय परवानग्या घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने मुर्तीची प्रतिष्ठापना करणे गरजेचे असते, परंतु या सर्व बाबी धाब्यावर बसवून डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची बेकायदेशीर स्थापना करण्यात आली, काही मुठभर लोकांनी आंबेडकरी संस्कृतीच नष्ट करुन प्रस्थापित राजकारण्यांना बहाल केली,आता तर या आंबेडकर स्मारकाचा ठेकेदारानी धंदा सुरू केला आहे, शासनाचा आदेश फाट्यावर मारत या ठेकेदाराने आंबेडकर स्मारक भाड्याने देण्याचा सपाटा लावुन लोकांकडून पैसे उकळण्याचा धंदा सुरू केला आहे, या ठिकाणी, लग्न समारंभ, वाढदिवसाचे कार्यक्रम, हळदी समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजित करुन स्मारकाच पावित्र्य भंग करण्याच काम बिनबोभाट सुरू केले आहे,ही बाब अतिशय गंभीर असून खरा आंबेडकरी अनुयायी या गोष्टी कदापि सहन करणार नाही,
हे आंबेडकर स्मारक शासकीय स्मारक असाव या साठी आता संघर्ष करण्याची वेळ आली आहे, पालिका प्रशासनाने आता तातडीने हे स्मारक आपल्या ताब्यात घेऊन लवकरच शासकीय समिती स्थापना करावी आणि स्मारकाचा बेकायदेशीर वापर त्वरित थांबवावा, अन्यथा आंबेडकरी अनुयायांचा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही,आणि त्या दृष्टीने आता जास्तीत जास्तआंबेडकरी अनुयायांनी देखील आता पुढे होऊन हा मनमानी कारभार मोडीत काढत प्रस्थापित राजकीय पक्षांच्या कचाट्यात सापडलेले हे स्मारक मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,