बदलापूर! सन २०१८ पासून अपहरण झालेल्या मुलाच्या शोधात बदलापुर पश्चिम पोलिस,,,

कुळगाव बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याच्या हद्दीत सन २०१८ रोजी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले असल्याची घटना समोर आली आहे,
कुमार नमीद परिहार तेव्हाचे वय वर्षे १३, राहणार श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स साई वालीवली बदलापुर पश्चिम याला दिनांक ६/८/२०१८ रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास त्याच्या राहत्या घरा पासून कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले असल्याची तक्रार मुलाचे वडील हिरासिंग जयराम परिहार यांनी बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यात दाखल केली आहे, या वेळी पोलिसांनी तातडीने दखल घेऊन अज्ञात अपहरणकर्ते यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक T १८/१८ नुसार भा द वी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्याप मुलाचा शोध लागला नसल्याचे समजते,सदर प्रकरणी बदलापुर पोलिस विविध सुधार गृहात तसेच इतरत्र मुलाचा शोध घेत असुन,*डोळे_काळे, चेहरा गोल,केस काळे, भाषा हिंदी व मराठी, अंगावर पांढऱ्या रंगाचे टी शर्ट,व हाफ काळी पॅंट अशा वर्णनाचा मुलगा कुठे सापडल्यास*किंवा सुधार गृहात कोणी दाखल केला असल्यास तातडीने बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यात कळवण्याचे आवाहन बदलापुर पश्चिम पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे,