महान चक्रवर्ती सम्राट,लोककल्याणकारी प्रजाहितदक्ष राजा,सम्राट अशोक जन्मोत्सव दिन सिद्धार्थ नगर चिखलोली परिसरात जल्लौषात साजरा

भारताचा गौरवशाली इतिहास घडविणारा,भारताला बलशाली बनविणारा असाच एकच सम्राट या भारत भू जम्बूदिपात होऊन गेला तो राजा अर्थात महान चक्रवर्ती सम्राट,लोककल्याणकारी प्रजाहितदक्ष राजा,सम्राट अशोक यांचा जन्मोत्सव-जयंती दिन सर्व जेष्ठ-श्रेष्ठ समाजबांधव,उपासिका, विचारवंत,अभ्यासक,तरुणाई इ.सर्वांनी एकञित येतअंबरनाथ,पश्चिम मधील सिद्धार्थ नगर-चिखलोली,सर्वोदयनगर परिसरात विचारोत्सवाच्या रुपाने दि.२९ मार्च २०२३ रोजी विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती-चिखलोली,सिद्धार्थ नगर-चिखलोली,लाॕर्ड बुद्धा गृप-सर्वोदय नगर,सांस्कृतिक प्रदुषण मुक्त अभियान व चिखलोली बुद्धीस्ट फाऊंन्डेशन यांच्या पुढाकाराने जल्लौषात साजरी करण्यात आली.
या जयंतीदिनी भारताचा गौरवशाली इतिहास,सम्राट अशोकाने राजा म्हणून केलेले लोककल्याणकारी कार्य,मानवहित बरोबर प्राणी पक्षी जीवजंतू इ.बाबतचे कार्य,तथागतांनी दिलेला बौद्ध धम्म व एक राजा म्हणून धम्माचा केलेला प्रचार प्रसार,८४,००० लेणी स्तूप विहारे निर्माण,शैक्षणिक केंद्र-विद्यापिठे स्थापना,संविधानात समावेश,सम्राट अशोक जयंती सरकार तर्फे साजरी न होण्यातील उदासिनता इ.बाबत मार्गदर्शनातून वैचारिक प्रबोधन करण्यात आले.