सावली फाऊंडेशन कल्याण तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त महापुरुषांच्या प्रतिमा,विद्यार्थांना रंगबाॅक्स व मिठाई वाटप

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा भिवंडी येथे 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभात फेरी काढून संविधान निर्माते महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना ग्रामपंचायत सदस्या रेश्मा मगर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्य शुद्धोधन जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत , ध्वजगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले.
विद्यार्थांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे सादर केली तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
*प्रजासत्ताक दिनानिमित्त सावली फाऊंडेशन कल्याण तर्फे शाळेला महापुरुष व महामाता (डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, संविधान उद्देशिका,माता रमाई, अण्णाभाऊ साठे,बिरसा मुंडा)यांचे प्रतिमा भेट देण्यात आल्या
*शाळेतील सर्व विद्यार्थांना रंगबाॅक्स व मिठाई बाॅक्स व समोसे (खाऊ) वाटप करण्यात आले*.
या वेळी सावली फाऊंडेशन कल्याण संस्थेचे सरचिटणीस किशोर खरात यांनी संस्थेचे कार्य सांगून प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक अशोक गायकवाड यांनी केले.
आभार सहशिक्षिका दिलशाद शेख यांनी मानले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच सुमन वाघे, सदस्य शुद्धोधन जाधव, सदस्या रेश्मा मगर, सामाजिक कार्यकर्ते प्रा.निवृत्ती मगर, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे ,सावली फाऊंडेशन चे अध्यक्ष जयवंत जाधव, सरचिटणीस किशोर खरात, सदस्य दिपक जाधव,धनंजय कमोदकर, रमाकांत चव्हाण, शंकर नवधने,अर्चना जाधव,दिपाली खरात व ग्रामस्थ, महिला,युवक ,युवती विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.