जातीवादी सैतान भांडवलशाहीच्या आणि धर्माच्या माध्यमातून सत्ताधारी बनून,हुकुमशाहीच्या माध्यमातून गुलामी प्रस्थापित करतील,तेव्हाच संघर्षाचा खरा अर्थ राजकीय गुलामांना समजेल!_प्रा, डॉ ,ऊमेश पवार

* भारत देश हा सार्वभौम,सर्व धर्म समभाव,लोकशाहीप्रणित असणारा देश.पण या देशात न घडो ते घडले.ते म्हणजे ज्यांना धार्मिक तेढ निर्माण करायची होती,जातीजातींमध्ये वाद लावायचे होते अशी मनुवादी विचारसरणीने बरबटलेली संस्कृती सत्तेत आली.त्याला कारण आपआपसातील वाद.ते व्यक्ती गत हित जपण्यासाठी असणारे.त्याच वादातुन मुळ विचारसरणी सोडून त्या मनुवादी संस्कृती कडे वाटचाल करणारे राजकीय नेते हेच कारणीभुत.मनुवादी फक्त मुखाने बोलताना लोकशाही राबवत आहोत असे म्हणतात पण प्रत्यक्षात तशी कृती करतात का?ज्या *संविधानामध्ये धर्म,व्यक्ती पेक्षा देशाचे भवितव्य महत्त्वाचे असे म्हटले आहे* असे असताना उघड उघड हिंदुत्वासाठी आणि मोदींना मजबुत करण्यासाठी 400 पार चा नारा लगावणे हा गुन्हा होत नाही का?पण जो विरोध करेल तो गुन्हेगार.कारण बोलणारा भ्रष्टाचारी नसावा पण प्रत्येक पक्षात भ्रष्टाचार करणारेच जास्त.असे असताना हा देश लोकशाही प्रणितच रहावा असा प्रयत्न करणार कोण?या घातक असणाऱ्या मनुवादी प्रणित महायुतीला आडवण्यासाठी प्रयत्न करणारी महाविकास आघाडी मधिल घटक पक्ष घाबरत घाबरत विरोध करतात.जो परखडपणे विरोधात बोलतो त्याला इडी,सिबिआय ची भिती दाखवली जाते.पण न घाबरता बिनधास्तपणे काही नेते महाविकास आघाडीतील बोलतात त्यांना पाठिंबा द्यायला घाबरणारे माझ्या मते षंढच म्हणावे लागतील.समोर हुकुमशाहीतील गुलामी दिसत आहे पण तोंडाला कुलुप लावून बसणे हे योग्य आहे का? महाविकास आघाडी सुद्धा लढण्यासाठी सैनिकांचे संघ पाहिजेत पण वाटेकरी नकोत या भुमिकेने वागताना दिसत आहेत.जर ह्या जातीवादी मनुवादी हुकुमशाही सैतानांना रोखायचे असेल तर वेळीच आपल्याला कीती सिटा मिळतील हा विचार सोडून आपल्यासोबत लढण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी धडपडत असणारे सर्वच सोबती यांना सोबत घेवून *2024 ची लढाई संविधानासाठी,हुकुमशहांना रोखण्यासाठी* असे समजुन लढले तर नक्कीच मातब्बर झालेल्या मनुवाद्यांना आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या चमच्यांना थांबवण्यासाठी योग्य दिशेचे पाऊल ठरेल. *पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॕफ महाराष्ट्र ने कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेवून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला.यालाच म्हणतात संघर्षाच्या काळात संघर्ष करणारेच संघर्षाची लढाई लढण्यासाठी कठिबद्ध असतात* आज जशाप्रकारे संघर्षाच्या वेळी आपले सोडून जातात तेव्हा पाठिशी ठामपणाने उभे राहणारे यांच्या जवळ मैत्री युक्त संबंध कसे ठेवावे हे ठरवणे तेवढेच गरजेचे.दि.5एप्रिल 2024 मातोश्री येथे शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे,आदित्यजी ठाकरे,अनिलजी देसाई यांच्या समोर पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॕफ महाराष्ट्र चे अध्यक्ष मिलिंदजी सुर्वे तसेच कोअर कमिटी सदस्य मंगेशजी पगारे,रोहिदासजी वाघामारे,चंद्रकांतजी रुपेकर यांनी मैत्री चा प्रस्ताव ठेवला त्याला शिवसेनेकडून दुजोराही देण्यात आला.या मैत्री युक्त संबंधामध्ये पुढिल वाटचाल करण्यासाठी दोन्ही बाजुने तसेच महाविकास आघाडी कडूनही सन्मानपुर्वक मैत्री ची अपेक्षा! जर या संघर्ष काळात संघर्ष केला गेला नाही तर गुलामीला सोमोरे जावे लागेल.जर या ऐतिहासिक वेळेला गप्प राहिलात तर पुढिल पिडीला गुलामीच्या जोखडाखाली जोखडायला तयार आहात का?या विचार प्रत्येकाने करावा.हवेत असणाऱ्या महाविकास आघाडीने वेळीच सावध पावित्रा घ्यावा. प्रा.डॉ.उमेश पवार महासचिव महाराष्ट्र राज्य पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॕफ महाराष्ट्र