ताज्या घडामोडी

बदलापूर !! मुळगाव सोनावळा ग्रामपंचायत भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आदिवासींच्या न्याय हक्कासाठी महिलेचे आमरण उपोषण,,,

बदलापूर शहराला लागूनच असलेल्या मुळगाव सोनावळा गृप ग्रामपंचायत प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात दिनांक ८ एप्रिल २०२४ पासुन सोनावळा गावातील आदिवासी महिला वंदना नारायण खंडागळे अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत, सोनावळा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि ठेकेदार यांनी संगणमत करुन सोनावळा हद्दीतील केलेल्या रस्त्यांमध्ये मोठ्या भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप वंदना खंडागळे यांनी केला असून या रस्ते बांधकामांची चौकशी करून कारवाई करण्याची प्रमुख मागणी वंदना खंडागळे यांनी गटविकास अधिकारी अंबरनाथ आणि मा, तहसीलदार यांच्या कडे लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे माध्यमातून केली आहे,

त्याच प्रमाणे सोनावळा हद्दीतील वंदना खंडागळे यांच्या घराला प्रास्ताविक रस्ता असताना देखील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि ठेकेदार यांनी घरा समोर सुमारे तिन महिन्यांपासुन मोठ्या प्रमाणात खोदकाम करुन खड्डे करुन तो रस्ता तशाच परिस्थितीत सोडून दिला आहे, त्या मुळे खोदकाम केलेल्या रस्त्यावरुन जाणे येणे मुश्किल होऊन बसले आहे, घरातील वयस्कर व्यक्ती त्या मुळे घरा बाहेर पडु शकत नाहीत, या मध्ये ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी स्थानिक आदिवासी यांची दिशाभूल करुन आदिवासी बांधवांना एकमेकांविरोधात ऊभे केल्याचे कृत्य केले आहे असे वंदना खंडागळे यांचे म्हणणे आहे,

सुमारे तीन महिन्यांपासून घरा समोर मोठ्या प्रमाणात खोदकाम करुन प्रास्तावित रस्ता हा जाणुनबुजून बनवला जात नसुन स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, गावातील प्रत्येक घराला रस्ता बनवुन देणे ही स्थानिक ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे आणि राहत्या घराला अधिकृत रस्ता मिळणे प्रत्येकाचा अधिकार आहे,तसाच माझाही अधिकार असल्याचे वंदना खंडागळे यांनी सांगितले आहे, स्थानिक सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि ठेकेदार यांनी शासनाच्या निधिचा गैरवापर करून गावातील रहिवासी यांच्या घरा समोरील अंगणे देखील बेकायदेशीरपणे बनवून दिले आहेत,मग शासनाने मला मंजूर केलेला रस्ता का बनला जात नाही हा एक प्रश्न आहे, ग्रामपंचायत प्रशासन आता सदर बाबही एम एम आर डी कडे असल्याचे सांगत आहेत,मग ग्रामपंचायतीने या ठिकाणी खोदाई करण्याची गरज काय होती? स्थानिक ग्रामस्थांच्या अडचणी बाबत निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करणे ही ग्रामपंचायतची जबाबदारी आहे

या मुळे १) शासनाने प्रास्तावित केलेला माझ्या हक्काचा रस्ता बनवुन देणे २) सोनावळा हद्दीतील केलेल्या सर्व रस्त्यांची व निधीची चौकशी करणे ३) शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या ईसमावर कारवाई करणे ४) कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई,करणे !या प्रमुख मागण्यांसाठी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने दिनांक ८ एप्रिल २०२४ सकाळी ११;३० पासून तहसीलदार कार्यालयासमोर वंदना खंडागळे ह्या आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती पत्रकार संघटनेचे प्रदेश सचिव श्री भरत कारंडे यांनी दिली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.