ताज्या घडामोडी

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्र उभारणी कार्यात रमाईंचा त्याग मोठा : प्रा.शरद शेजवळ,,

नाशिक _शांताराम दुनबळे

नाशिक-:त्यागमूर्ती रमाई व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बालवयापासून सोसलेले कौटुंबिक-आर्थिक चटके, सामाजिक विषमता-जात-धर्मांध व्यवस्था व पुढील काळात या विरुद्ध आरंभलेली धार्मिक, सामाजिक,आर्थिक,राजकीय सुधारणा,मानवमुक्तीची चळवळीला त्यांच्या धर्मपत्नी रमाबाई भीमराव आंबेडकरांनी अनेक प्रकारचे दुःख,यातना सहन करून बाबासाहेबांना साथ दिली.बाबासाहेबांच्या शिक्षण व सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळीला रमाईने मोठी साथ दिल्यानेच ते राष्ट्रउद्गार कार्यात योगदान देऊ शकले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्र उभारणी कार्यात रमाईंचा त्याग मोठा असल्याचे प्रतिपादन लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा.शरद शेजवळ यांनी केले.
पिंपळगांव बसवंत येथील सोहन सिटी नागरी वसाहत येथे सोहन सिटी मित्रमंडळ, पिंपळगांव बसवंत सर्व धर्मीय नागरिकांनी मिळून माता रमाई आंबेडकर यांची १२६ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्या प्रसंगी आयोजित त्यागमूर्ती रमाई ह्या विषयावर प्रा.शरद शेजवळ बोलत होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यात ते जे काही देशासाठी योगदान करू शकले त्या करता कौटुंबिक,सामाजिक,शैक्षणिक कार्यात रमाई स्वतःला झोकून देऊन प्रसंगी मोल-मजुरी करून येणाऱ्या पैशात कुटुंब खर्च भागून त्यातून बाबासाहेबांच्या शिक्षण खर्चास जाणीवपूर्वक पैसा वाचवत असे,आपल्या जीवनातील सर्वसुखांचा त्याग करून रमाई बाबासाहेबांना समर्थ साथ देत असत असे प्रतिपादन प्रा.शेजवळ यांनी ह्या वेळी केले.


छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर,माता रमाई,माता सावित्रीबाई फुले,महात्मा फुले,अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमाना प्रारंभी पुष्पहार अर्पून अभिवादन करण्यात आले.
समीर देवकर,अरुण शिंदे,वृषाली कदम,हिराबाई केदारे,सागर, गांगुर्डे,अमोल आहिरे,संतोष आरगडे, सतीश जगताप,लहू निखाडे,हरी शिरसाठ,कल्पेश गवारे,आनंद गांगुर्डे आदी मान्यवर नागरिक ह्या वेळी उपस्थित होते.
ह्या प्रसंगी समर्थ वाघ,प्रतिभा शाहीर,काका साळवे
यांनी रामाईंच्या जीवन कार्यावरील समयोचित भाषण,गीते सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर गांगुर्डे यांनी केले.आभार आनंद गांगुर्डे यांनी मानले.सोहनसिटी मधील स्नेहा गांगुर्डे, ज्योती गांगुर्डे, कल्याणी अहिरे,मंदा गावरे, स्नेहल शाहीर युवक,युवती,महिला यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.या वेळी सोहन सिटी मधील महिला-माता भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.