ताज्या घडामोडी

बदलापूर नगरपालिकेच्या ईताहासातील पहिलीच घटना,, भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना,,,,

बदलापूर !! कुळगाव बदलापुर नगरपालिकेच्या भ्रष्टाचारा बाबत चौकशी समिती स्थापन करण्याची ही बदलापुर नगरपालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना असावी असे लोकपालक पत्रकार
प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी म्हटले आहे,कुळगाव बदलापुर नगरपालिकेच्या विकास कामात झालेल्या भ्रष्टाचारा बाबत चौकशी करण्याची मागणी करत लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ पासून नगरपालिका कार्यालया समोर बेमुदत लाक्षणिक साखळी उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती,

या मध्ये बदलापुर पश्चिम येथील सुमारे बारा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या अग्निशमन दलाच्या कार्यालय सुरू झालेल नसताना किंवा अग्निशमन दलाचे कार्यालय वापरात नसताना बदलापुर नगरपालिकेने नुतनीकरण करण्याच्या नावाखाली एक कोटी अकरा लाख रुपये ठेकेदाराला दिले असल्याने या बाबत चोकशी करुन कारवाई करण्याची मागणी या दोन्ही संघटनांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे,

त्याच प्रमाणे बदलापुर पश्चिम बॅरेजरोड वार्ड क्रमांक २३ मधिल ओपन जिम/गार्डनच्या नावाखाली साठी सुमारे चाळीस लाख रुपये ठेकेदाराला अदा केले असून या मध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी केला आहे,अशाच प्रकारे बदलापुर शहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी पालिका प्रशासनाने दिड कोटी रुपये खर्च करण्याचा घाट घातला असून रस्त्यावरील खड्डे मात्र आहे त्याच परिस्थितीत असल्याने या बाबत ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचे बिल अदा न करता या बाबत देखील चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे,

बदलापुर पश्चिम हेंद्रेपाडा येथील नगरपालिकेच्या जागेवरील लोकप्रतिनिधींच्या आधिपत्याखाली झालेले अतिक्रमण हटवणे तसेच अयोध्या नगरी ते मानव पार्क रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनाधिकृत बांधकामांसह अतिक्रमणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देखील या दोन्ही संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे, या साठी अनेक वेळा निवेदन देऊन देखील पालिका प्रशासन दखल घेत नसल्याने लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले होते, दिनांक ७ फेब्रुवारी पासून बेमुदत सुरू असलेल्या या आंदोलनाची पालिका प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर दोन्ही संघटनांनी आक्रमक भूमिका घेत दिनांक ११ फेब्रुवारी रोजी चक्का जाम आंदोलनाचा इशारा देताच पालिका प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाचे धाबे दणाणले असताना बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणिल पडवळ यांच्या उपस्थितीत पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी यांनी उपोषण स्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेऊन झालेल्या भ्रष्टाचारा बाबत चौकशी समितीची स्थापना करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे,

या मध्ये मुख्याधिकारी यांनी स्थापन केलेल्या समिती मध्ये सदरची चौकशी ही निःपक्ष व पारदर्शक होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार संघटनेचे प्रदेश सचिव श्री भरत कारंडे यांनी दिली आहे, आता जिल्हाधिकारी प्रशासन या बाबत कोणता निर्णय घेते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार असून येत्या पंधरा दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांनी चौकशी समितीला दिले आहेत, या मुळे मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांनी स्थापन केलेली समिती आता चौकशी अंती कशा प्रकारे अहवाल सादर करणार आहे व त्या नंतर मुख्याधिकारी त्या वर कोणता निर्णय घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार असून, चौकशी दरम्यान आंदोलकांना देखील वेळोवेळी चौकशी समिती समोर आपली बाजू मांडण्यासाठी ऊपस्थित राहण्याची विनंती पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे, परंतु अशा प्रकारे भ्रष्टाचारा बाबत चौकशी समितीची स्थापना ही बदलापुर नगरपालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी सांगितले आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.