नाशिक मध्ये समाजसेवक लेखक संदीप राक्षे, ज्ञानसिंधु साहित्य गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
जयप्रकाश जातेगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी नाशिक
ज्ञानसिंधू प्रकाशन नाशिक यांच्या वतीने शनिवार दि २५ फेब्रुवारी २०२३ रोजी राणी भवन नाशिक येथे लेखक व सामाजिक कार्यकर्ते संदीप राक्षे यांना राज्यस्तरीय ज्ञानसिंधू साहित्यगौरव पुरस्कार, जयप्रकाश जातेगावकर सर, डाॅ शंकरजी बो-हाडे सर, डाॅ वेदश्री थिगळे यांच्या शुभहस्ते देण्यात आला.. संदीप राक्षे हे माहिती व तंत्रज्ञान संगणक इंटरनेट आणि मोबाईलच्या डिजिटल युगात सामाजिक सांस्कृतिक कला व साहित्य क्षेत्रातील गरजूंना आधार मिळेल असेच काम करीत असतात,
गड किल्ले पुरातन मंदिर या ठिकाणांची भटकंती करून ते प्रवास वर्णन आपल्या लेखणीतून साक्षात उभे करतात, लेख वाचताना वाचकांना प्रत्यक्ष सोबत असल्याचा भास होतो. असे दर्जेदार लेखन करून अपरिचित स्थळांचा परिचय करून देतात. हे कार्य संदीप राक्षे यांचे खूप मोठे आहे. नवोदित साहित्यिकांना मदत करून त्यांच्या लेखणीला प्रोत्साहन देतात, भटक्या वंचित मुलांच्यासाठी संदीप राक्षे अहोरात्र कार्य करीत असतात. समाजसेवेच व्रत घेतलेले संदीप राक्षे कुठल्याही क्षेत्रात अग्रेसर पणे काम करीत असतात. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान व सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रभरात कार्यरत असतात हे विशेष आहे. अशी उत्तुंग कामगिरी करणा-या संदीप राक्षे यांच्या कार्याचा आलेख सतत उंचावत राहो या साठी हा पुरस्कार…