अपघाती निधन झालेल्या कर्मचा-याच्या वारसास निवडणूक आयोगाकडून जलद गतीने मिळाला १५ लाखांचा धनादेश.

शहापूर तालुक्यात लेनाड येथे कार्यरत असलेले केंद्रप्रमुख महेंद्र दत्तात्रय भोईर सर हे निवडणूक प्रशिक्षण पुर्ण करून घरी जात असतांना दि.०७/०४/२०२३ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले होते.
दि. ०२ मे २०२४ रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिवं. महेंद्र भोईर यांचे निवासस्थानी जावून त्यांचे हस्ते पत्नी मृणाल भोईर व मुलगा अक्षय भोईर यांचेकडे अपघाती विम्याचा धनादेश सुपूर्द केला.
शहापूर तालुका मुख्य निवडणूक अधिकारी मा. बाळासाहेब खांडेकर साहेब, तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी मा. कोमल ठाकूर मॅडम,पं.स. गटशिक्षणाधिकारी मा.भाऊसाहेब चव्हाण साहेब यांनी ही मदत तात्काळ मिळावी यासाठी जिल्हाधिकारी मा.अशोक शिनगारे साहेब यांचेकडे वेळीच प्रस्ताव सादर केल्याने व जिल्हाधिकारी मा.शिनगारे साहेबांनी प्रस्ताव तातडीने मंजूर करुन महिन्या भराच्या आत अपघात मृत्यू लाभ मिळवून दिला आहे. अपघात झालेल्या दिवसापासून शहापूर तालुका अध्यक्ष मनोज गोंधळी सर व जगदिश गायकवाड सर प्रयत्नशील होते.
सदर लाभ जलद गतीने मिळवून दिल्या बद्दल दि.०३ मे २०२४ रोजी शहापूर तालुका उपाध्यक्ष,राजेश रोकडे सर, तालुका सरचिटणीस जगदिश गायकवाड सर, संघटक अनिल वाढविंदे सर तसेच राज्यकार्यकारणी सदस्य अशोक गायकवाड सर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मा.खांडेकर साहेब व तहसिल मा.कोमल ठाकूर मॅडम यांची प्रत्यक्ष भेट घेवून जलद गतीने मदत मिळवून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त केले.
याकामी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शहापूर तालुका अध्यक्ष मनोज गोंधळी सर,उपाध्यक्ष राजेश रोकडे सर, भाऊराया चौधर सर, दत्तू पालवी सर, संघटक अनिल वाढविंदे सर व सरचिटणीस जगदिश गायकवाड सर यांचे सहकार्य लाभले.